दादा कोंडके विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

0

मराठी चित्रपटांचा असा अभिनेता ज्यांचे आपल्या अभिनयानेच नव्हे तर आपल्या चित्रपटांच्या शिर्षाकांनीच सेंसर बोर्डला रडायला लावलं. त्यांच्या सिनेमाच्या शीर्षकात दोन अर्थाचे शब्द असल्यावरही त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालायला सेंसर बोर्डला फक्त अपयश हाती आलं. होय, आज आपण बोलतोय सन्माननीय दादा कोंडके यांच्याबद्दल. मराठी चित्रपट सृष्टीचे नामवंत अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.

त्यांना सामान्य लोकांचा सुपरस्टार देखील म्हटल्या जायचं. दादा कोंडकेचे ९ सिनेमे तब्बल २५ आठवडे सिनेमाघरात गाजत राहिले; याची गिनीजबुकात देखील नोंद आहे. या महानायकाचा मृत्यू १४ मार्च १९९८ रोजी दादर, मुंबईला झाला. त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त हा विशेष लेख.

दादा कोंडकेंचे खरे नाव कृष्णा कोंडके. त्यांचे बालपण लहान-मोठ्या दादागिरी करण्यात गेलं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं कि लहानपणी भांडणान ते विटा, दगड, काचेच्या बाटल्या वापरायचे. त्यांनी राजकारणात देखील पाय रोवले. त्यांनी स्वतःला शिवसेनेशी जोडलं. शिवसेनेच्या रैलीत भीड जमवायला त्यांच्या पुढाकार असायचा; सोबतच विरोधकांवर देखील त्यांनी कसून हल्ला केला आहे.

 

दादा कोंडके आपल्या “विच्छा माझी पूर्ण कर” या मराठी नाटकासाठी खूपच प्रसिद्ध होते. हे नाटक कॉंग्रेस विरोधी मानलं जायचं कारण या नाटकात इंदिरा गांधींची मस्करी करण्यात आली होती. दादा कोंडकेनी या नाटकाचे ११०० पेक्षा जास्त स्टेज शो केले आहेत. सन १९७५ मध्ये आलेला “पांडू हवालदार” हा देखील त्यांच्या एक बहुचर्चित सिनेमा आहे. यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. या व्यतिरिक्त त्यांचे सोंगाड्या आणि आली अंगावर हे सिनेमे देखील खूप प्रसिद्ध आहे.

मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर आणि दादा कोंडके यांची खूप घनिष्ट मैत्री होती. दादा कोंडकेंच्या सिनेमात त्यांनी गायिलेले गाणे देखील खूप प्रसिद्ध आहेत. दादा कोंडके एक हास्य कलाकार होते आणि आपल्या चित्रपटात खूप डबल मिनिंग कॉमेडी करायचे आणि म्हणूनच दादा कोंडके खूप प्रसिद्ध होते. दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांचे शीर्षक इतके अस्पष्ट आणि डबल मिनिंग होते की त्यांना पास करण्याकरिता सेन्सर बोर्डला लाज वाटायची. कोंडकेचे चित्रपट आणि त्यांचे शीर्षक पाहून त्यांना पास करणे ही सेंसर बोर्डसाठी सर्वात मोठी आव्हान होती.

दादा कोंडकेंच्या मृत्यू नंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईच्या भारत माता सिनेमागृहात त्यांचे चित्रपट दाखविण्याची परंपरा आहे. त्यांच्या आणखी दोन मराठी चित्रपटांनी सुवर्ण जयंती साजरी केली. त्यांच्या मराठी चित्रपटाचे नाव आली अंगावर, तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, असे आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. त्यांचा पहिला हिंदी सिनेमा “तेरे मेरे बीच में”, मराठीत सुद्धा बनला आहे. अश्या या महानायकाला स्टार मराठी कार्यकर्त्यांचे विनम्र अभिवादन.

 

Mobiles Price In India

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!