Loading...

चेहऱ्यावर डार्क सर्कल्स असल्यास करा हा रामबाण उपाय!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सौंदर्य म्हणलं की सगळ्यात आधी आठवतात डोळे. प्रत्येकालाच आपल्या शरीरातील सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आपले डोळे. साहित्यात तर डोळ्यांची तुलना समुद्र, गुलाब ह्यांसोबत केली आहे. प्रत्येकजण आपल्या डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतो. परंतु तणावग्रस्त जीवनशैली, अपुरी झोप, लोहाची कमतरता ह्यामुळे बऱ्याचदा डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात. मग अशावेळी काय करावं ह्यासाठी नक्की वाचा.

  • गुलाबजल

 

Loading...

गुलाबजलात भिजवलेले कापसाचे गोळे डोळे आणि डोळ्यांच्या खाली चोळावे. ह्यामुळे डोळ्यांना थंडावा तर मिळतोच शिवाय डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून तीन वेळा असे केल्याने फायदा मिळतो.

  • काकडी

 

अनेकवेळा आपण चित्रपटात किंवा मालिकांमध्ये पाहतो की त्यातील नट-नट्या डोळ्यांवर काकडी ठेवून बसतात. अर्धा तास काकडीचे काप डोळ्यांवर असे ठेवल्याने थंडावा मिळतो तसेच डोळ्यांखाली असलेला हा काळेपणा जाण्यास मदत होते.

  • टोमॅटो

 

टोमॅटोमध्ये Lycopene नावाचे रसायन असते. टोमॅटोचा रस डार्क सर्कल्सवर दहा मिनिटे लावून ठेवावा व नंतर थंड पाण्याने धुवावे. आठवड्यातून दोन-तीन वेळा असे केल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

  • दूध
Loading...

 

दुधामध्ये असणारे पोषकतत्व आपल्या शरीरासाठी लाभदायक तर असतात शिवाय सौंदर्यासाठी ह्याचा उपयोग होतो. थंड दूध कापसाच्या गोळ्यांच्या सहाय्याने काळवंडलेल्या भागावर लावावे. पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवून घ्यावे. असे केल्याने डार्क सर्कल्स लवकर कमी होतात.

  • हळद

 

सर्व गोष्टींवर हळद गुणकारी आहे हे आपण आमच्या मागील लेखात वाचलेच आहे. चला जाणून घेऊ या डार्क सर्कल्स साठी हळद कशी उपयुक्त आहे. हळदीच्या लेपाने पंधरा मिनिटे मसाज केल्याने त्वचा उजळते. पण जर तुमची त्वचा कोरडी असेल तर लेप बनवताना त्यात बदाम तेल घालायला विसरू नका.

भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.