Loading...

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, धनंजय मुंडे राष्ट्रवादी सोडणार?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केलं आहे. शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तसंच राष्ट्रवादीतील एक मोठा गट फोडण्याचाही अजित पवार यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे आणखी एक मोठे नेते धनंजय मुंडे हेदेखील पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांचा फोन कालपासून बंद असल्याची माहिती आहे. गेल्या काही तासांपासून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे ते अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Loading...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली हे तर निश्चितच होतं. मात्र आता पक्षासोबत पवार कुटुंबातही फूट पडल्यांचं स्वत: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘पक्ष आणि कुटुंब फुटलं’ असं स्टेट्स व्हॉट्सअॅपवर सुप्रिया सुळे यांनी ठेवलं आहे.

महाराष्ट्रात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ‘अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी फुटली, हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Loading...

या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जेव्हा या सगळ्या घटनाक्रमाबद्दल प्रतिक्रिया देतील, तेव्हाच याबाबतची स्पष्ट होऊ शकणार आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.