महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता झाला अभिनेता !

0

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उगवत आक्रमक नेतृत्व, धनगरनेता ,बहुजनांचे युवा नेतृत्व ,गोपीचंद पडळकर. बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी अराजकीय व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न करणारे गोपीचंद पडळकर .संपूर्ण महाराष्ट्रभर ध्येयवादी संघर्षमय वाटचाल करत बहुजनांच्या मनात घर केलं ,कित्येक मेळाव्याच्या माध्यमातून बहुजन समाजातील युवकांना योग्य मार्गदर्शन करून विचारांची क्रांती घडवण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर आजतागायत करत आहेत.

अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळवले आहे ,कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ स्व कर्तृत्वावर बहुजन समाजाचा युवा नेतृत्व म्हणून समाजमान्यता मिळवली. एक सर्वसामान्य धनगर समाजातील कुटुंबात जन्माला आलेले गोपीचंद पडळकर. ह्या ध्येयवादी युवकाने 2007 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली.

त्यांचा राजकारणातला दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे मात्र सध्या गोपीचंद एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे त्यांचा धुमस मराठी चित्रपट ,गोपीचंदांच्या अंगी असलेले कलागुण एका चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येतील.गोपीचंद हे बहुजन समाजातील लोकांचे रिअल हिरो तर आहेतच पण चित्रपटातसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

जबरदस्त ऍक्शन ,आकर्षक संगीत ,काल्पनिक कथानक धुमस चित्रपटाची जमेची बाजू.धुमस मराठी चित्रपटाची तुलना दाक्षिणात्य चित्रपटसोबत तुलना केली जाऊ शकते .नुकताच चित्रपटाचा ट्रेलर पहिला , गोपीचंद यांची एन्ट्री पाहून चित्रपटात त्यांचा कलाविष्कार पाहणे रंजकतेचे ठरेल .दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणेच ग्लॅमर, ऍक्शन असल्यामुळे चित्रपट अधिक उत्सुकता वाढवेल .

ह्या चित्रपटाची निर्मिती उत्तमराव जाणकार आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे .शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केले आहे .चित्रपटाचे एक रोमँटिक गाणं नुकताच रिलीज झाले ,गाणं ऐकून चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक निर्माण होते .राजकीय पटलावर गोपीचंद हे मैदान तर गाजवतायत पण त्यांचा हा लोकनेता ते अभिनेता झालेला प्रवास विलक्षण आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!