पाकिस्तान च्या दहशतवादी तळांवरच्या हल्ल्याचे फोटो पाहिलेत का..?

0

आज पहाटे साडे तीन च्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला चढवला. मिरज २००० ही फायटर प्लेन वापरून दहशतवाद्यांच्या लाँच पॅडस् ना उध्वस्त केले. पाकिस्तानी लष्कराने कालच रात्री केलेल्या ट्विट ला आज पहाटे भारतीय फौजेने खोटे ठरवले. काळ PAF म्हणजेच पाकिस्तानी फौजेच्या ट्विटर हँडल वरून एकिस्तानी जनतेला उद्देशून एक मजेदार ट्विट केले गेले होते.

‘सगळे निवांत झोपा, आम्ही तुमच्या सेवेत जागे आहोत’ असे ते ट्विट होते. मात्र जागे आहोत सांगून झोपी गेलेल्या पाकिस्तान्यांना आज भारतीय हवाई दलाच्या सैनिकांनी चांगलेच खडबडून जागे केले. पुलवामा हल्ल्याच्या उत्तरादाखल आज भारताने पाकिस्तानच्या तीन दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली.

१२ विमानांनी १२ दहशतवादी ठिकाणे उध्वस्त केली. साधारण २०० ते ३०० दहशतवादी नरकात पाठवत भारताने प्रतिउत्तर दिले आहे. ह्या हल्ल्याची खबर सर्वप्रथम पाकिस्ताननेच ट्विट करून दिली असल्याने भारतात पुरावे मागणाऱ्यांची देखील तोंडे बंद केलीत. मात्र ह्या भारतीय हवाई दलाने केलेल्या हमल्यात आमचे काहीही नुकसान झालेले नाही असा पाकिस्तानचा दावा आहे.

भारताकडे मात्र हल्ल्याचे व्हिडीओ फुटेज आणि उध्वस्त केलेल्या आतंकवादी चौक्यांचे फोटोही उपलब्ध आहेत. हे फोटो पाहून नक्कीच कोणाही भारतीयांचे उर अभिमानाने भरून नक्कीच येईल. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला उत्तर देण्यासाठी सज्ज असलेल्या पाकिस्तानला हवाई हल्ले करून चांगलेच सळो की पळो करून सोडण्यात भारताला यश आलेलं आहे.

हया व्हिडीओ मसध्ये हवाई हल्ल्याची दृश्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर. फोटोंमध्ये कशाप्रकारे त्यांच्याकडे दहशतवादी तळांचे नुकसान झालेले आहे ते दिसते.

अशा प्रकारच्या हल्ल्यांची अपेक्षा भारतीय नागरिकांना होतीच आणि भारतीय सरकार त्याची पूर्तता करतानाही दिसुन येत आहे. ह्या हवाई हल्ल्याच्या यशस्विते बद्दल भारतीय हवाई सेनेचे स्टार मराठी तर्फे खूप खूप अभिनंदन..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!