दीपिका पदुकोण बद्दल ही गोष्ट तुम्ही कधीच ऐकली नसेल, अभिनेत्री होण्याआधी ती करायची हे काम !

0

‘दीपिका पदुकोण’ म्हणजे हसताना पडणाऱ्या खळ्यांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री..!! आपल्या सुंदर अदांनी तिने सगळ्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीतल्या ‘हार्ट थ्रॉब’ रणवीर सिंग बरोबर ती विवाहबद्ध झाली. हा प्रेमविवाह खूप जणांना आणि जणींना हुरहूर लावून गेला. दीपिका रणवीर चे नातेही तसेच आगळे वेगळे आहे. स्वतः रणवीर दीपिकाचे कौतुक करताना थकत नाही. त्याच्या कौतुकावर दीपिकाच्या गोड लाजणेही खूप मोहक वाटते. अशा दीपिका पदुकोण बद्दल तुम्ही ह्या अजूनही मजेदार गोष्टी ऐकल्या आहेत का..??

दीपिका पदुकोण ही बॅडमिंटन पटू प्रकाश पदुकोण ह्यांची मुलगी आहे पण ती स्वतः अभिनेत्री बनायच्या आधीच नॅशनल लेव्हलची म्हणजेच राष्ट्रीय पातळीवरची बॅडमिंटन पटू झाली आहे. हे तुम्हाला कदाचित माहितीही असेलच. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ती राज्य स्तरीय (स्टेट लेव्हल) बेसबॉलपटू सुद्धा आहे.

तुम्हाला म्हणून सांगतो , संजय लीला भन्साळी ची आवडती अभिनेत्री असलेली ही दीपिका त्यांच्याच ‘सावरिया’ ह्या चित्रपटातून ह्या चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार होती पण भन्साळी ने सोनम कपूर ला हा सिनेमा दिला. हा सावरिया आणि ओम शांती ओम एकाच दिवशी रिलीज झाले होते. आणि तिचा डेब्यु ठरलेला ओम शांती ओम हा सुपर डुपर हिट ठरला होता. म्हणजे नशिबानेच तिला सावरिया मधून उचलून दुसरा चांगला सिनेमा मिळवून दिला.

हे तर आपल्याला माहीतच असावे की दीपिका मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करत आहे. मात्र तिला कायम एका गोष्टीची दुःख आहे आणि पुढेही राहील ते म्हणजे तिला ‘यश चोप्रा’ ह्यांच्या सिनेमाची मात्र कधीच हिरोईन नाही बनू शकली. मात्र यश चोप्रा तिला एक हुशार अभिनेत्री म्हणून कायम पसंत करत होते.

नृत्य निपुण दीपिका सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामागचे रहस्य असे आहे की ती श्यामक दावर ची विद्यार्थिनी होती आणि ही सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वतः भरतनाट्यम देखील शिकलेली आहे. त्यामुळे अभिनयाबरोबर नृत्यातही निपुण असलेली सर्वगुण संपन्न अशी ही अभिनेत्री आहे.

हे तर सगळ्यांना ठाऊक आहे की रणवीर आणि दीपिकाचे प्रेमप्रकरण गेल्या ६ वर्षांपापासून सुरू होते. पण ह्या प्रकरणाला संजय लीला भन्सालींमुळे खूप हातभार लागलाय. कारण दीपिका रणवीर एकमेकांबरोबर आधी काम करत नव्हते. त्या दोघांना एकत्र आणले ते भन्साळी यांनी. एक पाठोपाठ एक असे ३ चित्रपट ह्या तिघांनी केले. राम लीला, बाजीराव मस्तानी आणि त्यानंतर पद्मावत हे तिन्ही रेकॉर्ड तोड हिट सिनेमे ठरले. त्यामुळे हे दोघे एकत्र आले आणि प्रेमात पडून लग्नगाठीत बांधले गेले ह्याचे श्रेय भन्सालींनाच जाते.

मागच्या वर्षी ६ वर्षांच्या प्रेमप्रकरणाला पूर्णविराम देत दीपिका रणवीरने लग्न केले खरे. पण मजेशीर बाब अशी की त्यांनी साखरपुडा खूप आधीच करून ठेवला होता. ह्याचाच अर्थ लोकांना / चाहत्यांना ह्या नात्याचा उलगडा खूप उशीर झाला असला तरी ते दोघे मात्र प्रेम बंधनात खूप आधीच म्हणजे ४ वर्षांपूर्वीच बांधले गेले होते.

अभिनेत्री म्हणून कदाचित तिचे खूप नखरे असतील , स्वयंपाकही जमत नसेल पण तरी दीपिकाला घरातल्या वाण सामानाची खरेदी करणे मात्र फार आवडते. मॉल मध्ये जाऊन धान्य आणणे, भाजीवाल्याकडून भाजी घेणे अशी कामे तिला खूप आवडतात. त्यामुळे कधी एखाद्या भाजीवल्यासोबात भाजीचा भाव करताना दीपिका कोणाला दिसली तर आश्चर्यचकित होऊ नका..!!

 

बेंगळुरू ची दीपिका जन्माने भारतीय नाही हे किती जणांना माहीत असेल..?? होय हे ही खरे आहे. तिचा जन्म डेन्मार्क च्या कोपनहेगन मध्ये झाला होता आणि ८ महिन्यांची झाल्यावर ती भारतात स्थायिक झाली. मित्रांनो तुमच्या आमच्या आवडत्या दीपिकाबद्दल नवीन गोष्टी वाचून तुम्हाला काय वाटले ते आम्हाला जरूर कळवा..!!

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!