चुकून ही खाऊ नका हे अन्न पदार्थ एकत्र आयुर्वेदात काय सांगितलं आहे या बद्दल जाणून घ्या !

0

अन्न हे पूर्णब्रह्म म्हणूनच आपण खातो. स्वयंपाक बनवताना घरातील वडीलधारी खास काळजी घेतात. किती मसाले, किती मीठ, किती साखर ह्याच प्रमाण कसं मोजून मापून असतं. वेगवेगळे पौष्टिक अन्न सगळ्यांना कसे मिळेल ह्याचा विचार करून रोज विविध पदार्थ बनवले जातात. पण तरीही कधी कधी आपले पोट दुखते, फूड पॉइझनिंग होते. अर्थात बाहेरील अन्न खाल्ल्यामुळे होत असावे.. पण घरगुती अन्न खाऊनसुद्धा पोटाच्या तक्रारी उद्भवतात. हे असे का होत असावे..??

हजारो वर्षांपासून चालत आलेला आयुर्वेद ‘विरोधी अन्नाची संकल्पना मांडतो.. तुम्ही ऐकली आहे का ही संकल्पना..?? विरोधी अन्न म्हणजे असे पदार्थ जे एकमेकांसोबत खाणे अयोग्य असते. त्यांच्या मिश्रणाने दोन ऍसिड एकत्र केल्याप्रमाणे प्रक्रिया घडते. आणि त्यामुळे आपली तब्येत बिघडू शकते. इतकेच नव्हे तर जीववरही बेतू शकते हो..!! त्यामुळे विरोधी अन्न’ कोणते हे आपल्याला माहीत असलेच पाहिजे. बघुयात आपण इतके वर्ष कोणते विरोधी पदार्थ खात आहोत आणि कोणते बंद केले पाहिजेत.

१. कांदा आणि दूध : हे दोन चुकूनही एकत्र खाऊ नये. एक झाल्यावर नंतर दुसरे असेही खाऊ नये. दुधावर कांदा किंवा कांद्यावर दूध पोटात गेले तर आपल्या शरीरास हे घातक आहे. ह्या कॉम्बिनेशन मुले आपल्याला त्वचारोग होऊ शकतात. जसे दाद, खाज, एगसीमा, सोरायसिस इ.

२. फळे आणि दूध : कुठलीही फळे आणि खास करून आंबट फळे आणि दूध हे देखील अत्यंत वाईट विरोधी अन्न आहे. फणस, संत्री, मोसंबी, द्राक्ष ह्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते आणि त्यामुळे दूध देखील फाटते. हे सुद्धा ऍसिडिटी कारक आहे आणि ह्यामुळे देखील त्वचारोग उद्भवतात. मात्र आवळा आणि दूध हे कॉम्बिनेशन हानिकारक नाही. तसेच आंबा आणि दूध घालून केला आमरस सगळ्यांनाव्ह आवडतो मात्र कैरी आणि दूध म्हणजे विष.. शरीरास अत्यंत हानिकारक. मांसाहारी लोकांना दूध आणि मासे देखील वर्ज्य आहे. ह्याने गॅस , ऍलर्जी, स्किन चे आजार उद्भवतात.

४. उडीद आणि दही : तुम्ही म्हणाल हे तर आम्ही कधी खात नाही. उडदाचे आणि दह्याचे एकत्रीकरण कशाला करावे लागते बुव्वा..? पण आठवा पाहू तुमची अगदी आवडीची डिश आहे ही.. चांगला ताव मारतो आपण ह्यावर. ती आहे ‘दही वडा’. आपण एक वेळी सहज ३ – ४ प्लेट दहिवडा रिचवतो. मात्र उडीद आणि दही हे खरे तर आयुर्वेदाचे प्रमाणे विरोधी अन्न आहे. ह्याचे कारण असे की ह्या दोन पदार्थांच्या एकत्रिकरणामुळे आपला रक्तदाब वाढतो. अर्थात हे काही आपण रोज खात नाही म्हणून ठीक आहे. पण जर रोजच खाल्ले तर ५ , ६ महिन्यात हार्टअटॅक देखील येऊ शकतो इतके हे दोघे एकत्रीतपणे खाल्ल्यास आपल्या शरीराला घातक आहेत. मग दही वाडा खायचाच नाही का..?? तर उडदाच्या ऐवजी मुगाच्या डाळीचा बनवून बिनधास्त खा की दहिवडा..!!

५. बटाटे आणि भात : कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलावरोध होऊ नये असे वाटत असल्यास बटाटा आणि भात हे एकत्रित पणे खाणे टाळा. भले हे तुमच्या आवडीचे अन्न आहे. पण हे तुमच्या पाचनप्रक्रिये साठी हानिकारक आहे.

६. चिकन आणि मिठाई : आयुर्वेदात तर मांसाहारालाच मज्जाव आहे त्यामुळे चिकन पेक्षा शाकाहारी खाणे कधीही उत्तम. तरीही मांसाहारी लोकांसाठी चिकन आणि मिठाई वर्ज्य आहे. ह्यामुळे पोट खराब झालेच समजा.

७. कोल्ड्रिंक वर मिंट : कोल्ड्रिंक मुळात पिऊच नये. योगी रामदेवबाबा तर ते टॉयलेट क्लिनर म्हणून वापरले पाहिजे असे सांगतात. पण तरुण मंडळींना ते पटत नाही. कोल्ड्रिंक शिवाय त्यांचे पण हलत नाही. त्यामुळे हे कोल्ड्रिंक प्यायल्यास त्यावर पेपरमिंट युक्त कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. कोल्ड्रिंक आणि मिंट हे एकत्र आल्यास सायनाईड बनते. म्हणजे हे विषय जणू जे घेतल्यास लगेच मृत्यू..!!

 

तर मंडळी जेवताना काळजी घ्या. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा.. दोन विरोधी पदार्थ खाऊन आपली तब्येत बिघडवू नका. हे विरोधी अन्न टाळणे खूप महत्त्वाचे आहे, आपल्या साठी आणि आपल्या कुटुंबासाठी देखील..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!