अश्याप्रकारे चुकूनही खाऊ नका ब्रेड खालल्यास होऊ शकते नुकसान. !

0

न्याहारी, नाष्टा, ब्रेक फास्ट किंवा ब्रंच पण आम्ही भारतीय विदेशी पदार्थांना चटावलेले आहोत. अहो पोहे, उपमा, सांजा किती दिवस खाणार ? थोडा पास्ता, थोडे नूडल्स हवेतच. पराठे आणि समोसे खाऊच हो पण जरा ‘मख्खन लगा के’ ब्रेड होऊन जाऊद्या. ‘ब्रेड’ शिवाय तर हल्ली दिवस सरत नाही  ब्रेड बटर, सॉस, जॅम, ब्रेड आणि ऑम्लेट ह्या परदेशी चवींपासून ते आज कालच्या अस्सल भारतीय चवींपर्यंत आपण पोचलो आहोत.

ब्रेड पकोडे, ब्रेड रोल्स, शाही तुकडा, दही ब्रेड भल्ले किती किती प्रकार. दिवसाची सुरुवातच ब्रेड ने होते. पण आता डाएट काँशिअस लोकांमुळे ब्रेड खाण्याची पद्धत बदलली आहे.. मैद्याच्या पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत ब्रेड ची जागा आता होल व्हिट ब्रेड म्हणजेच संपुर्ण गव्हाच्या पिठाच्या ब्रेडनी घेतली.

परत मल्टी ग्रेन म्हणजेच सगळ्या प्रकारच्या धान्यातून बनलेला हेल्दी ब्रेड बाजारात आल्यावर सगळे त्यावर तुटून पडलेत. सतत नवीन काहीतरी टूम निघते आणि आपण फॉलो करतो.. सध्या चालतीत आहे ते म्हणजे ब्रेड कोणताही असो तो भाजून खायचा..

छान कुरकुरीत क्रिस्पी भाजलेला, टोस्ट केलेला ब्रेड..!! खूप हेल्दी आहे हं हे.. पण तुम्हाला माहीत आहे का करपायच्या दिशेने गेलेला ब्रेड खाणे आपल्यासाठी किती हानिकारक आहे..?

त्याचं असं आहे की स्टार्च युक्त पदार्थ जास्ती तापमानावर शिजवले गेले तर त्यातून ‘एक्रीलामाईड’ नावाचा पदार्थ बनतो आणि हा शरीराला जबर हानी पोचवतो.. अगदी कॅन्सरची सुद्धा जोखीम असते..

एक्रीलामाईड म्हणजे काय असतं भाऊ? हा एक असा रासायनिक पदार्थ आहे जो कागद किंवा प्लास्टिक ची निर्मिती करताना वापरला जातो. डच अभ्यासानुसार जेव्हा काही पदार्थांना खूप जास्ती गरम केले जाते त्यातून रासायनिक प्रक्रियेतून हे एक्रीलामाईड रसायन बनते.

ह्याचा शरीरावर काय परिणाम होतो..? तर हे रसायन जेवणातून आपल्या DNA पर्यंत पोहोचते. आपल्या चांगल्या पेशी नष्ट करून कॅन्सरच्या पेशी निर्माण करायला मदत करते. हे एका प्रकारचे न्यूरोटॉक्सिनच जणू. विषारी पदार्थ शरीरात वाढवून शरीराची संपूर्ण हानी करणारे..

मग आता करावं तरी काय..??  सोप्प आहे..!! ही एक रोजच्या जीवनात घडत जाणारी प्रक्रिया आहे.. छोटेसे बदल करून असे शरीरात होणारे रासायनिक बदल आपण टाळू शकतो. ब्रेड खाणे सोडू शकत नसाल तर किमान त्याला करपवू नका. ब्रेड भाजताना त्याला छोट्या आचेवर भाजा. जेणे करून हा ब्रेड ‘ओव्हर हीट’ म्हणजेच अति गरम होणार नाही करपलेला ब्रेड तर टाकूनच द्या.. म्हणजे पेट भी खुश और सेहत भी..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!