तांब्याच्या भांड्यात हे पदार्थ चुकूनही ठेऊ नका.. बघा ह्याचे दुष्परिणाम..

0

तांब्याच्या भांड्यातलं पाणी रोज पिणे शरीराला खूपच फायदेशीर आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काही लोक तर रोज तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणीच पितात. पण ह्याच तांब्याच्या भांड्यात जर आपण काही पदार्थ ठेवले तर ते पदार्थ आणि तांबे ह्यांच्यात काही रासायनिक क्रिया होतात आणि तो पदार्थ खाणं हे शरीराला खूप अपायकारक ठरतं हे तुम्हाला माहिती आहे का?  नसेल माहिती, तर नक्की जाणून घ्या.

१- दही : दही आणि तांबे ह्यांचा संयोग झाला तर एक रासायनिक क्रिया घडते आणि ते दही कडू व्हायला सुरुवात होते, असे दही जर आपण खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर उलटा परिणाम होतो, उलट्या होऊन शरीराची पचन क्रिया पार बिघडून जाते. म्हणून ” दही ” कधीही तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये.

२- लिंबू : लिंबू हे सुद्धा तांब्यावर परिणाम करते म्हणून लिंबाचा रस कधीही तांब्याच्या भांड्यात ठवणे शरीराला घातक ठरते. लिंबाच्या रसमध्ये ऍसिड असल्यामुळे तांब्यावर त्याची रासायनिक क्रिया होते आणि लिंबाचा रस विषारी बनतो. त्याची चव बदलते, तो रस जाई आपण प्यायलो तर पोटात विषारी द्रव गेल्या प्रमाणेच भयानक परिणाम होतो.

३- व्हिनेगर : व्हिनेगर सुद्धा तांब्यावर परिणाम करतं, लिंबाच्या रसाप्रमाणेच व्हिनेगरचाही विषारी पदार्थ तयार होतो. ही रासायनिक क्रिया शरीराला अतिशय घातक ठरते. पोटात गेल्यास चक्कर येणे, उलटी होणे असे दुष्परिणाम जाणवतात. म्हणून व्हिनेगर आणि तांब्याचा संबंध येणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

४ – लोणचं : कोणत्याही प्रकारचं लोणचं कधीही तांब्याच्या भांड्यात ठेवत नाहीत. कारण कैरी, किंवा लिंबाचं लोणचं हे ही तांब्याच्या संपर्कात आले तर विषारी घातक होऊन शरीरावर फार वाईट परिणाम होतो. हे पदार्थ ह्या रासायनिक क्रिये मुळे कडू होतात. म्हणजेच विषारी होतात.

५- ताक : दह्याप्रमाणेच ताकामुळे सुद्धा तांब्यावर परिणाम होतो. ताक कडवट होत जाते, म्हणजेच कळकते. कळकलेले ताक कडू लागते. हे कडू ताक प्यायल्यास आपली पचन शक्ती पार बिघडून जाते थकवा जाणवतो, आणि ही पचन शक्ती बिघडली की जुलाब, उलट्या होतात, ह्यातून बरे व्हायला वेळ लागतो.

म्हणून तांब्याच्या भांड्यात वर सांगितलेले ५ पदार्थ कधीही ठेऊ नयेत , ह्यासाठी फार पूर्वीपासून आपले पूर्वज सुद्धा दह्यासाठी मातीची भांडी वापरत होते किंवा लोणचं किंवा ताकासाठी चिनी मातीची भांडी किंवा बरण्या वापरत. त्यामुळे असली रासायनिक क्रिया होत नव्हती. तांब्याची भांडी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरणे हे योग्य.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!