तुम्हाला माहित आहे का आंध्रप्रदेशातील या मंदिराबद्दल ज्याचे ७० खांब आहेत हवेत !

0

भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे भारत भर असलेली भव्य आणि दिव्य मंदिरं. प्राचीन काळापासून विविध शिल्प आणि उंच उंच कळस असलेली वेग वेगळ्या पंथातल्या लोकांनी , राजे रजवाड्यांनी बांधलेली ही सुंदर सुंदर आणि वेग वेगळ्या देवतांची मंदिरं म्हणजे एक अनमोल भारताचा  ठेवाच. ह्या सुंदर मंदिरामुळे त्या त्या गावाला विशेष महत्व आलं आहे.  ह्यातली बहुतेक मंदिरं ही भारताच्या दक्षिणेकडे स्थापन झाली आहेत. आणि म्हणून ह्या दक्षिण भारताला ‘गोपुरांचा प्रदेश’ म्हटलं जातं.

कुठेही गेलं तरी ही भव्य मंदिरं आणि त्यांची उंच उंच गोपुरं लांबूनच आपल्या नजरेत भरतात. विविध प्रकारच्या , विविध रंगांच्या दगडांवर सुंदर नक्षीकाम, आणि मूर्ती कोरून अनेक वर्षे ह्या मंदिरांचं काम केलं गेलं. काही कलाकारांनी ह्या मंदिरांच्या निर्माणासाठी अनेक पिढ्या खर्च केल्या. तेंव्हा ही भव्य मंदिरं उभी राहिली.  प्रत्त्येक मंदिराचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणून ही सगळीच मंदिरं पाहणे आनंद दायी ठरते.

म्हणून ह्या भारतीय कलेला पाहायला देश विदेशातून असंख्य पर्यटक येतात आणि डोळे दिपवून टाकणारे हे कलेचे ऐश्वर्य पाहून आचंबित होतात. असंच एक भव्य आणि आश्चर्याने आचंबित करणारे मंदिर कदाचित तुम्ही पाहिलं नसेल. पण ही त्याची महती वाचल्यावर निश्चितच ते मंदिर पहायची इच्छा तुमच्या मनात जागृत होईल.  कोणतीही इमारत उभी करताना त्याचे चार खांब आधी जमिनीत खोलवर खणून, खालपासून उभे केले जातात आणि नंतर त्याच्या आधारावर बाकीची इमारत उभी राहते.

पण हे जे मंदिर आहे ते प्रचंड आहे. त्यामुळे त्याला असंख्य जाड जाड आणि उंच उंच खांब आहेत. प्रत्येक खांब हा सुंदर नक्षी कोरून सजवलेला आहे , त्या नक्षीकामाचा सारखेपणा प्रत्येक खांबावर दिसतो. म्हणजे प्राचीन काळच्या ह्या कलेला आणि त्या कलाकारांना धन्यवाद देऊ तेवढे कमीच ठरतील. कारण त्या काळात कोणती ही आधुनिक साधनं, नसताना हे कलावैभव त्यांनी उभारलं आणि आजही त्या कलेचा आनंद आपल्याला अनुभवता येतो आहे, धन्य ती कला आणि धान्य ते कलाकार.

हे जे भव्य मंदिर उभारलं गेलं आहे ते , आंध्रप्रदेश मधल्या आनंतपूर जिल्ह्यात आहे. १६ व्या शतकात ह्या मंदिराची उभारणी केली गेली आहे, म्हणजे किती प्राचीन आहे हे मंदिर ? आणि आज सुद्धा हे मंदिर तसंच उभं आहे. इतकं मजबूत आणि कणखर बांधलं आहे. म्हणजे त्या वेळची स्थापत्य कला ही आजच्या आधुनिक काळातल्या स्थापत्य कले पेक्षा चांगली होती असंच म्हणावं लागेल. कारण १६ व्या शतकापासून आज पर्यंत किती उन्हाळे , पावसाळे ह्या मंदिराने पाहिलेत तरी सुद्धा ते त्याच मजबूत स्थितीत आहे.

हे मंदिर “लेपाक्षी” मंदिर म्हणून ओळखले जाते. हे लेपाक्षी मंदिर कुर्मा सेलम नावाच्या डोंगराळ भागात उभारलं आहे. ह्या मंदिराचा आकार कासवासारखा आहे. आणि अगस्ति ऋषींच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधले गेले असे म्हटले जाते. विरुपन्ना आणि विरन्ना ह्या दोन भावांनी मिळून ह्या मंदिराची उभारणी १५८३ साली केली असे सांगितले जाते. रामायणात सुद्धा ह्या मंदिराचा उल्लेख आढळतो. रावण आणि जटायू पक्षी ह्यांची झटापट ह्याच ठिकाणी झाली . आणि जटायू इथे जखमी होऊन खाली कोसळला.

नंतर भगवान श्रीरामाने जटायूला त्याच्या अंगावरून हात फिरवून म्हटले ‘उठ पक्षा ‘. आंध्र च्या भाषेत ‘ला पक्षी’ म्हणजे ‘उठ पक्षा’ . म्हणून कदाचित हे लेपाक्षी मंदिर नाव पडले असावे. ‘भद्रकाली’ ह्या देवीची भव्य मूर्ती ह्या मंदिरात आहे . आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या मंदिराचे भव्य आणि नक्षीदार ७० खांब हे जमिनीला टेकलेले नाहीत. हे सगळे खांब जमिनीपासून अर्धा इंच वरतीच हवेत तरंगलेले दिसतात. ह्या खांबांना जमिनीचा काहीही आधार नाही. असेच अधांतरी असलेले हे खांब म्हणजे ह्या स्थापत्य कलेतलं रहस्य आहे.

असे सगळे हवेत तरंगणारे खांब पाहून आपण आश्चर्य चकित होऊन जातो. ह्या खांबाच्या खालून एखादे नवे वस्त्र इकडून तिकडे सरकते. आणि असे खांबाच्या खालून फिरवलेले वस्त्र घरात ठेवले तर सुख, शांती, समृद्धी घरात नांदते अशी समजूत आहे.त्या मुळे सगळे जाणारे भाविक ह्याची प्रचिती घेत असतात. ह्या जमिनीशी काहीही संबंध नसलेल्या खांबांना ‘आकाश स्तंभ’ असेही म्हटले जाते. हा स्थापत्यकलेचा आश्चर्यकारक नमुनाच म्हणता येईल. म्हणून अशी सगळी अपल्यादेशातली आश्चर्ये एकदा तरी बघावीत. एखाद्या नवल कथेमध्ये असतात तशी ही सगळी आश्चर्ये मनाला भुरळ घालतात. म्हणूनच एकदातरी ह्या गोपुरांच्या प्रदेशाची सफर करावी. आणि धन्य व्हावं.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!