तुम्हाला माहित आहे का जर आज फेसबुक नसतं तर काय झालं असतं ?

0

काय झालं असतं जर फेसबुक अस्तित्वात नसतं? तुम्ही आपल्या मित्रांशी कसे जोडले गेले असते? कसं शोधलं असतं त्या मुलीला जिला तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या लग्नात बघितलं? नमस्कार, मी शुभम पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक महत्त्वाची आणि नवलाची माहिती जी आहे आपल्या सर्वात आवडत्या वेबसाईट बद्दल म्हणजेच फेसबुक बद्दल.

आज फेसबुकला १५ वर्ष पूर्ण झालेत आणि या १५ वर्षांच्या काळात एका सध्या नेट्वर्किंग वेबसाईट वरून आज फेसबुक जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक आहेत. चला तर जाणून घेऊया फेसबुकबद्दल काही नवलाची माहिती.

१. वेबसाईटची सुरुवात : फेसबुकची सुरुवात झाली ती होस्टेलच्या एका रूममधून. मार्क झुकेरबर्ग आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून हारवर्डच्या आपल्या डॉर्मरूम मध्ये thefacebook.com नावाची वेबसाईट सुरु केली. सुरुवातीला ही वेबसाईट एक ऑनलाईन निर्देशिका होती जिथे जाऊन तुम्ही आपल्या कॉलेजच्या मित्रांना शोधू शकता, माहिती वाचू शकता आणि मैत्री करायची असेल तर त्यांना विनंती करू शकता. तुम्हाला आपल्या आवडी निवडी तिथे नमूद करायची जागा फेसबुकने उपलब्ध करून दिली होती.

२. फेसबुकचा रंग : निळाशार फेसबुकचा रंग आपल्या सर्वांनाच आकर्षक वाटतो पण तो रंग नेमका निळाच का निवडला यामागेही एक कारण आहे. मार्क झुकेरबर्गला आहे रंग आंधळेपणा. त्याला हिरवा आणि लाल रंगात फरक लक्षात येत नाही म्हणून त्याने निळा हा रंग आपल्या वेबसाईटसाठी निवडला आणि बघा ! आज तोच रंग सर्वांचे आकर्षण आहे.

३. एक मुलाखात : २००९साली डेव्हलपरसाठी ब्रायन एक्टन फेसबुकला मुलाखत द्यायला गेला पण फेसबुकने त्याची निवड केली नाही. ब्रायन परत आला आणि याहूसाठी काम करायला लागला. काही वर्षानंतर त्याने एक मोबाईल अप्प्लीकेशन बनवली जी फेसबुकने १९ बिलियन अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी केली. ती अप्लिकेशन म्हणजे व्हाट्सअप.

४. लाईक-बटन : फेसबुकचे लाईक “बटन” हे “ऑसम” बटन म्हणून इंजिनियरने डिजाईन केले. तत्कालीन जेष्ठ अभियंता अँड्र्यू बॉसवर्थ सोबतच सगळेच अभियंते उत्साही होते पण मार्कने मात्र सुरुवातीचाच निर्णय कायम ठेवला आणि फेसबुकवर लाईक बटनच कायमस्वरूपी रूढ झाले.

५. आकडे : फेसबुकचे आकडे फारच भन्नाट आहेत. दर सेकंदाला फेसबुक वर आठ लोकं आपले अकाऊंट बनवतात आणि अमेरिका आणि भारतात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोबतच सर्वात जास्त फेक अकाऊंट सुद्धा भारतीयांचेच आहेत. ६८% वापरकर्ते हे मोबाईलवरूनच फेसबुक वापरतात.

६. गुंतवणूक : पीटर थियल, पहिल्या वहिल्या ऑनलाईन पेमेंट कंपनीचे संस्थापक यांनी फेसबुकला सर्व प्रथम मोठी गुंतवणूक दिली आणि शेवटच्या सत्रापर्यंत फेसबुकने आपली किंमत ५० बिलियन अमेरिकन डॉलर इतकी केली होती. आता फेसबुक ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे.

७. घोटाळा : फेसबुक-केंब्रिज ऍनालिटिका डेटा स्कॅंडल हा 2018 च्या सुरुवातीला एक मोठा राजकीय घोटाळा होता जेव्हा उघड झाले की लाखो लोकांच्या फेसबुक प्रोफाइलची वैयक्तिक माहिती त्यांच्या संमतीविना राजकीय उद्देशांसाठी वापरली होती आणि हे उघडकीस केलं ते केंब्रिज ऍनालिटिकाने. या कारणाने फेसबुकच्या शेअर किंमतीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे आणि आता टेक कंपन्यांच्या डेटाच्या वापराच्या कठोर नियमांची मागणी केली गेली आहे.

तर कसा वाटला तुम्हाला हा लेख, नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या कंपनी बद्दल अशी माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!