तुम्हाला माहिती आहे का ? लठ्ठपणा कमी करण्याचा अगदी साधा आणि सोपा उपाय.

0

आपल्या आवडत्या कपड्यात स्वतः बघणे ह्यासारखे सुख नाही.. नाही का..?? पण गुटगुटीत शरीरयष्टीकडे झुकणाऱ्यांचे दुःखच वेगळे.. लिफ्ट बंद असेल तर पायऱ्या शत्रू वाटतात तर कधी बस सुटत असेल तर पळत जाणे जीवावर येते. थंडीचे कोण व्यायाम करतो..? आणि उन्हाळ्यात तर बुवा आम्ही उन्हात जाऊच शकत नाही.. पावसाळ्यात छत्र्या घेऊन कोण फिरणार..? एक ना दोन आमचे प्रॉब्लेम समजून घेतो तरी कोण..??

खरे तर बारीक होणे, सुडौल बांधा असणे हे सगळ्यांचे स्वप्न असते. काही कारणांनी आपले प्रयत्न कमी पडतात तर कधी कधी खूप प्रयत्न करूनही आपले वजन मात्र ‘जैसे थे’ असेच राहते..!! आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अतिशय सोप्पी ट्रिक जी केल्यास तुम्हाला वेगळे काहीही न करता तुमच्या जुन्या आवडत्या कपड्यात पुन्हा शिरता येऊ शकेल..

‘काहीही खाल्यावर दीड तासानंतरच पाणी प्या..’ आहे का नाही सोपे..! बरं दीड तासाने पाणी कसे प्याल..? तहानल्यामुळे गटागट पिणार, नाही का..? तर ‘नाही’.. सावकाश एकेक घोट हळूहळू प्या. ज्या प्रमाणे जेवणाचे घास ३२ वेळा चावून चावून खावे त्याच प्रमाणे पाण्याचे घोट कासवगतीने प्यावे.

आणि हे आयुर्वेदात सुद्धा सांगितले आहे.. असे का बरे सांगितले असेल..?? तर गटागट पाणी प्यायल्याने शरीराला भयंकर नुकसान होते. आपण तहानलेले असतांना बाटली उघडतो आणि ढसाढसा पाणी गिळतो. इथेच सगळ्या आजारांचे मूळ आहे. सगळ्यात पाहिले तर पाणी बसून प्या कारण उभे राहून प्यायल्यास गुढगे गेलेच म्हणून समजा.. पुरुषांमध्ये उद्भवणारा हर्निया हा रोग देखील गटागट पाणी प्यायल्यानेच होतो बरं का..?!

तर ह्यावर आपला आयुर्वेद असे सांगतो की जसे आपण चहा कॉफी कसे मजा घेत घेत आणि घोट घोट पितो तसेच पाणीही घोट घोट प्यावे. ह्या उपायांमुळे बाकीचे रोग तर पळतीलच पण तुमचे वजन देखील आटोक्यात राहते. तुमचे जे वजन आहे ते तेवढेच राहते. अजिबात वाढत नाही.

आता पुढचा प्रश्न असा की जे वजन आधीच वाढलेले आहे त्याचे काय..?? तर हे अतिरिक्त वजन सुद्धा रोजच्या घोट घोट पाणी पिण्याच्या सवयीवर हळू हळू उतरायला लागते. म्हणजे साधारण ६ – ७ महिन्यात तुमचे १० किलो वजन कमी होऊ शकते. आता वजन जसे कलेकलेने वाढले आहे ते कमी करायला सुद्धा थोडी वाट बघवीच लागणार ना..? त्यामुळे पाणी हळू हळू पिण्याची सवय लावा.

त्यातून ते कोमट असल्यास उत्तम.. शरीर आपोआप हा बदल आत्मसात करते. आणि काही महिन्यानंतर त्याचा परिणाम ही दाखवू लागते. तुमचे हवे तितके वजन तर घटेलच आणि त्याच बरोबर शरीराला हळू हळू पाणी पिण्याची सवय जडल्याने गुढगेदुखी, टाच दुःखी, सांधे दुःखी हे देखील हळू हळू गायब होईल. एवढंच काय तर ज्यांना सकाळी उठल्यावर चक्कर येते , डोके दुखते त्यांना हे त्रास देखील चमत्कारिक रित्या कमी होताना जाणवेल.

करायचं काय तर फक्त काहीही खाल्ले तर ‘दीड’ तासानेच पाणी प्यायचे आणि तेही घोट घोट..! आणि मग तुम्ही स्वतःलाच बॉडी शेमिंग आणि बेढब शरीरापासून मुक्त कराल.. कल्पना छान आहे ना..?? लागा तर मग कामाला.. आज पासूनच..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!