Loading...

तुम्हाला माहिती आहे का भात खाण्याचे हे दुष्परिणाम आजच जाणून घ्या !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

रोज नवीन नवीन डायट चे फॅड आपल्याकडे येतच असतं. ‘स्थूलता’ हे खूप मोठे मार्केट आहे. ह्यावर कित्येक जिम, कित्येक फिटनेस क्लासेस, कित्येक डायटीशीयन ची क्लिनिक्स चालू असतात. आणि ह्यातील प्रत्येक जण आपल्याला बारीक होण्यासाठी ‘भात’ बंद करायला सांगतो. पण फक्त बारीक होण्यासाठीच कशाला, हा बंद केला तर अजूनही काही फायदे शरीराला होऊ शकतात. पण ज्यांना भाताशिवाय जेवण झाल्यासारखे वाटतच नाही, त्यांना भात सोडणे ही एक शिक्षाच वाटते, नाही का..?!

 

भात जर पांढरा शुभ्र म्हणजेच अति पॉलिश केलेला असेल तर तो आपल्या शरीराला हनिकारकच असतो. हावर्ड स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ ह्यांच्या एका संशोधनाअंती असे सांगण्यात आले आहे की रोजचा २ वाट्या भात सुद्धा आपल्याला मधुमेह आणि स्थूलता सारख्या रोगांकडे ढकलतो. एम्स ची न्यूट्रिशनिस्ट रेखा पाल – शाह म्हणते की ह्या पांढऱ्या आणि पॉलिश केलेल्या तांदळात फायबर आणि न्यूट्रिशन नसतातच. मग अशा तांदळाचा शरीराला फायदा कसा होईल..? बघा तर असा भात खाल्ल्याने आपल्याला अजून काय काय नुकसान होते.

Loading...

१. स्थूलता : शरीराला बेढब बनवण्यामधे ह्या पॉलिश केलेल्या तांदळाचा सगळ्यात मोठा हात असतो. ह्या मध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्याने रोजचा १ वाटी भर भातही आपल्याला स्थूलतेकडे नेतो.

२. मधुमेह : १ वाटी पॉलिशड भातामध्ये १० चमचे साखरेच्या मध्ये असतील इतके कॅलरीज असतात. म्हणजे १० चमचांइतकी साखर आपल्या पोटात जाते. मधुमेह नसल्यास तो उद्भवणे आणि मधुमेहींचा आजार बळावणे ह्याला हा भात कारणीभूत ठरू शकतो.

३. पोषक द्रव्यांची कमतरता : शुभ्र तांदळात पोषक द्रव्यांची म्हणजेच न्यूट्रियन्ट्स ची कमतरता असते. असला भात खाण्याने शरीराला उपयुक्त असणारे व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतच नाहीत.  तसेच दुसऱ्या अन्नपदार्थांपासून पाचन प्रक्रियेत शोषले जाणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा हा भात अडवतो. म्हणजेच ह्या प्रक्रियेत बाधा घालतो.

४. अतिसेवनाची सवय लागते : नुसता भातच खायची सवय असलेल्यांना हा मुद्दा अगदी चपखल बसेल. भात खाल्ला की खूप पोट भरल्यासारखे वाटते. पण तो पटकन पचतो आणि लगेच भूक ही लागते. मग काय आपण परत ताट भरून आपला आवडता भाताचा प्रकार हादडतो. आणि अशाप्रकारे शरीराला त्रासदायक असणारा हा पांढरा भात, अतिप्रमाणात खायची सवयच जडते.

Loading...

५. हाडे ठिसूळ होणे : ‘व्हिटॅमिन सी’ ची कमतरता असल्यास आपल्याला हाडांशी संबंधित विकार होतात. कित्येक स्त्रियांना बाळंतपणानंतर कॅल्शियम, सी व्हिटॅमिन ह्याची गरज असते. म्हातारवयात सुद्धा हाडांचे त्रास उद्भवू नयेत म्हणून व्हिटॅमिन सी हवेच. पण ह्या पॉलिशड तांदळात तर हे नसल्याचा जमा असतात. मग तुमची व्हिटॅमिन सी ची गरज भागेलच कशी..? म्हणजे हाडे ठिसूळ होण्यास हा पांढरा भात भर घालतो..

६. जास्तीचे मीठ पोटात जाते : जास्ती मिठाचे शरीराला असणारे तोटे आपल्याला माहीतच आहेत. भाताचा चान्स पदार्थ म्हणजे चायनीज फ्राईड राईस असो की बिर्याणी तो बनवताना आपल्याला त्यात मीठ घालणे आवश्यकच असते. भाताला स्वतःची चव नसल्याने आपण बिन मिठाचा भात खाऊच शकत नाही. मग काय जास्ती भात खाल्ला तर जास्ती मीठ ही पोटात जाणारच. आणि अतिमिठाने होणारे त्रास डोकं वर काढणार ते वेगळे..!!

७. पचनक्रिया बिघडणे : अहो हा भात खाणे म्हणजे पाचन प्रक्रिये मध्ये छेदछाड करण्यासारखेच आहे. करण ह्या भातात पाचन प्रक्रियेला उपयुक्त असणारे फायबर्स नसतातच. मग पोट सतत फुगल्यासारखे वाटते.

आता चित्रपटातील खलनायका प्रमाणे हा पांढरा, अति पॉलिश केलेला भात आपल्या शरीराला घातक ठरतोय.. काय बुवा आम्ही सुद्धा तुम्हाला भात बंद करायला सांगतोय..!! अशी तुमची तक्रार असणारच नाही का..?! अहो पण आम्ही पर्याय संगतो ना.. अति पोलिश केलेल्या पांढऱ्या शुभ्र भाता ऐवजी ब्राउन राईस किंवा हातसडीचे तांदूळ वापरा ना.. कूकर सुटताच ह्याचा गोड खमंग सुवास तुम्हाला पांढऱ्या भाताचा विसर पडण्यास पुरेसा आहे. आणि हा कमी सडलेला भात शरीराला अतिउत्तम आहे ह्याची खात्री डॉक्टर आणि न्यूट्रिशिअनिस्ट सुद्धा देतात.. मग काय सोडा तो पांढरा भात आणि ताव मारा हातसडीच्या भातावर..!!

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.