तुम्हाला माहित आहे का रमेश भाटकर यांचा शेवटचा चित्रपट कोणता ?
‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेले आणि एकपेक्षा एक भारी चित्रपटात आपल्या अनेक भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबई येथील एलीझाबेत इस्पितळात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
वर्षभऱ्यापासून रमेश भाटकर कर्करोगाशी झुंज देत होते आणि आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी मुंबईत आपला शेवटचा श्वास घेतला. रमेश भाटकर आपल्या टीव्ही वरील मालिकांतील अभिनयामुळे सुद्धा खूप प्रसिद्ध होते. त्यांनी कमांडर, हॅलो इंस्पेक्टर आणि दामिनी यांसारख्या सुप्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
त्यांचे ‘अश्रूंची झाली फूले’ हे नाटक चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ यांसारखी अनेक नाटकं गाजली. ते थेटर असो वा असो मराठी सिनेमा, रमेश भाटकरांनी प्रत्येक जागी आपल्या नावाचा झेंडा रोवला आहे.
त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे आणि हे काम करता करता त्यांनी आपल्या आयुष्याची ३० वर्षे चित्रपट सृष्टीला बहाल केली. १९९८ मध्ये आलेल्या तिसरा डोळा या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच प्रसिद्ध आहे. नुकत्याच आलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली होती. आणि हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला .
हदपार, बंदगी, युगंधरा या चित्रपटात सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. १९४९मध्ये जन्मलेले रमेश भाटकर आपल्या मागे बायको मुलगा, सून असा परिवार सोडून सगळ्यांचा निरोप घेतला. अश्या या महानायकाला टीम स्टार मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या परिवाराला बळ देवो.