Loading...

हिवाळ्यात ह्या फळांचे सेवन केल्याने दूर होतात बरेच आजार!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

हिवाळा येताच त्वचेच्या समस्या आणि सांधेदुखीचा त्रास डोकं वर काढतात. पण घाबरून जाण्याची गरज नाही. हिवाळ्यामध्ये मिळणारी ही फळं जर तुम्ही खाल्ली तर हा त्रास कमी होऊ शकतो.

प्रत्येक ऋतु आणि त्यात घेतला जाणारा आहार ह्यांचं विशिष्ट नातं असतं तसंच हिवाळा आणि त्यात घेतल्या जाणाऱ्या आहाराचं आहे. थंडीमुळे त्वचा रुक्ष होते, शरीरातील गरमी कमी होते. त्यामुळे शरीराला सतत गरम ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये शरीरात होणाऱ्या क्रिया ह्या अधिक जलद गतीने होतात. त्यामुळे हिवाळ्यात जास्त भूक लागते. पण काहीतरी अरबट-चरबट खाण्यापेक्षा हिवाळ्यात मिळणारी फळे खाल्ली तर ऊर्जा तर मिळतेच शिवाय शरीराला देखील त्याचा फायदा होतो.

Loading...

  • खजूर

थंडीपासून बचाव करण्यासाठी खजूर फायदेशीर आहे. हे शरीराला गरम ठेवण्याचे काम करते. तसेच ह्यात असणाऱ्या पुरेशा ऊर्जेच्या प्रमाणामुळे हे शारीरिक ऊर्जेसाठी उत्तम स्रोत आहे. शिवाय ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी त्यांच्या आहारात खजुराचा समावेश जरूर करावा. ह्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

  • अंजीर

अंजिराचे सेवन हे त्वचेसाठी लाभदायक आहे. त्वचेला मऊ आणि मुलायम करून ताजेतवाने ठेवण्यासाठी हे मदत करतात. अंजीर त्वचेसाठी मॉइस्टचराईजरचे काम तर करतेच शिवाय केसांसाठी हे उपयुक्त आहे. हाडांना मजबूत करण्याचे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील अंजीर करते.

  • चिकू

व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असलेले चिकू त्वचा उजळवण्यासाठी मदत करतात. ह्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

  • सीताफळ

Loading...

खूप बिया असल्यामुळे खायला नको वाटत असले तरी सीताफळाचे सेवन तुमच्या त्वचेसाठी खूप महत्वाचे कार्य करते. ह्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असतात. हे त्वचेसाठी मॉइस्टचराईजर आणि नैसर्गिक स्क्रबचे काम करते.

  • पपई

व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण पपई त्वचेला उजळ बनवते. ह्यात असणारे अँटीऑक्सिडंट्स निष्क्रिय प्रोटिन्स आणि मृत पेशींना काढून टाकण्याचे काम करतात. अँटी-एजिंग म्हणून पपई गुणकारी आहे.

  • अननस

खाण्यासाठी किचकट असले तरी अननस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. ह्यात असणारे अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावर येणारे पुरळ, काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्वचेला साफ ठेवण्यासाठी ह्याची मदत होते.

भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.