आपले दात पांढरे शुभ्र बनवण्यासाठी करा हे पाच घरगुती उपाय !

0

पांढरे-शुभ्र आणि स्वच्छ दात कुणाला आवडत नाही? निरोगी आणि स्वच्छ दात असल तर मोठ्ठ्याने हाहा करून हसायलाही जरा बरं वाटते पण जर पिवळे असले तर मात्र आपलं हसणं जरा कमीच होते. रात्री खाल्लेले अन्न जर दातात राहिले तर ते तसेच साडू शकते आणि त्याने तुमचे दात पिवळे होऊ शकतात. अगदी वाइन आणि चहासारखे पदार्थ सुद्धा दात “रंगीत” करण्यास कारणीभूत आहेत आणि ज्यूस-कोल्डड्रिंक सुद्धा. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि आपले पिवळे दात कसे पांढरे करायचे.

१. आहार : ऍसिडिक पदार्थांमुळे तुमचेदात पिवळे दिसू शकतात. जे लोक आपल्या दातांच्या पिवळ्या रंगाविषयी चिंतित आहेत त्यांची चिंता वाढविली आहे ती कॉफी आणि सोड्याने. त्यांना माझं एकच सांगणं आहे कि नेहमीच दात घालत रहा; निदान ते खाल्ल्या-पिल्यावर तरी. दंतचिकित्सक सांगतात कि जेवल्या नंतर ३० मिनिटांनी आपले दात घासावेत. धूम्रपान करणे किंवा तंबाखू उत्पादनांमधून बाहेर पडणाऱ्या निकोटीनमुळे सुद्धा दातांवर प्रभाव होऊ शकतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

2. तेल : आता तेलाचा फायदा कसा म्हणाल? तर आपले तोंड हे तेलाने धुवायचे. त्याने काय होते कि तुमच्या दातात अडकून असलेला मलबा किंवा बॅक्टेरिया सगळे निघून जातात. हे काही ब्रशिंग किंवा फ्लॉसिंगसाठी पर्याय नाहीये पण एका संशोधनात असं आढळून आलं काही निवडक तेलाने जर तुम्ही तोंड धुतलं तर तुमचं तोंड नेहमीच स्वच्छ राहील. नारळ तेल, सूर्यफूल तेल किंवा तीळाचे तेल तुम्ही वापरू शकता.

3. खाण्याचा सोडा : खाण्याचा सोडा सुद्धा तुम्हाला आपले दात पांढरे करण्यासाठी मदत करू शकतो. हा एकदम हळुवारपणे तुमच्या दातांवर काम करतो, काही लोकांना वाटते कि त्याने तुमच्या हिरड्यावर वाईट परिणाम होतात पण २०१७ मध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे कि याचे काहीच साईड इफेक्ट नाहीत. खाण्याचा सोडा देखील बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतो प्लाक कमी करण्यास मदत करते आणि दांत सडण्यावर सुद्धा प्रतिबंध घालू शकते.

4. हायड्रोजन पेरोक्साईड : हायड्रोजन पेरोक्साइड हे एक सौम्य ब्लीच आहे जे तुमचे दात पांढरे करू शकतो. सर्वोत्कृष्ट निकालांसाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साईडच्या मिश्रणाने सुद्धा 1-2 मिनिटांसाठी ब्रशिंग करण्याचा प्रयत्न करू शकता. पण कधीकधी. हायड्रोजन पेरोक्साइड दातांची संवेदनशीलता वाढवू शकतो, म्हणून दीर्घकालीन वापरासाठी हे योग्य नाही.

5. उत्कृष्ट मौखिक स्वच्छता राखणे : उत्कृष्ट मौखिक स्वच्छता राखणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी कोणत्याही व्यक्तीला पांढरे दात मिळविण्यापासून दूर ठेऊ शकत नाही. नियमित ब्रशिंग आणि फ्लॉसिंग तामचीनी संरक्षित करते, किड्याला प्रतिबंध घालते आणि दाग काढून टाकते. तर हे आहेत काही उपाय जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि दंतचिकित्सकाला बक्कळ पैसा देण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेयर करा. शेयर करण्यासाठी पैसे देण्यासाठी गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!