पिढीजात कत्तलखाना बंद करून बनला गौरक्षक, सरकारने दिला त्याला पद्मश्री पहा कोण आहे ती व्यक्ती !

0

खाटकाच्या घरी रोजचा रक्तपात त्या खाटकाला काही नवीन नाही. कामच ते, सरकारमान्य कत्तलखान्यात का असेना पण रोज प्राणी कापायचं. स्वतःच्या वडिलांच्या कत्तलखान्यात रोज रोज गायी आणि गोवंशातील प्राणी कापले जाताना बघून मात्र एक मुलाचे हृदय द्रवते आणि तो बनतो गोवंश रक्षक. कोणत्याही समुदायाच्या भावना लगेच दुखतात अशा सध्याच्या नाजूक परिस्थितीत ‘अरे ला कारे’ म्हणणाऱ्या लोकांमध्ये, ‘शब्बीर मामु’ माणसांवरच नाही तर प्राण्यांवर सुद्धा अतोनात माया करतात.

कोण आहेत हे शब्बीर मामु..??  महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात छोट्याश्या गावात शब्बीर त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. वयाच्या १० व्या वर्षांपासून शेख शब्बीर ने वडिलांच्या कत्तलखान्यात गायींना कापताना पाहिले होते.. त्यांना मुक्या जनावरांच्या ओरडण्याने विव्हळण्यानें खूप मानसिक यातना होत असत. काही वर्षांत त्यांनी वडिलांचा कत्तलखाना बंद करवला आणि मारण्यासाठी आणलेल्या सगळ्या गायींना पाळले. तेव्हापासून आज पर्यंत म्हणजे गेली पन्नास वर्षे शब्बीर मामू गायीचे आणि इतर गो वंशाचे पालन पोषण करत आहेत. आटा पर्यंत त्यांनी १७६ गायींना जीवनदान दिले आहे आणि त्यांच्या नैसर्गिक मृत्यू पर्यंत त्यांचा सांभाळही केला आहे. ह्या सगळ्या गायी गुरांचे पालन पोषण करण्याकरता त्यांनी वडिलोपार्जित जमिनीचा वापर करतात. ह्या जमिनीतून चाऱ्या साठी लागणारे गवत, धान्य उगवले जाते.

आता गायींच्या पालन पोषणासाठी त्यांना इतके वर्ष सांभाळल्याने शब्बीर मामुना त्यां प्राण्यांच्या बद्दल खडानखडा माहिती झाली आहे. गावात कोणती गाभण किंवा बाळंत झालेली गाय म्हैस असेल तर त्यांची देखभाल देखील शब्बीर मामुंच्या निरीक्षणाखाली होते. ह्याच गायींच्या ‘शेणावर’ शब्बीर मामुंचे घर ही चालते. शेण विकून त्यांना वर्षाकाठी साथ सत्तर हजार रुपये मिळतात. कधी त्यांच्या कडची गाई गुरे विकायची वेळ आली तर बिन कामाची किंवा मरायला टेकलेली ती जनावरे परत त्यांच्या पाशी आणून सोडावीत ह्या बोली वर शब्बीर मामू जनावरे त्यांच्याकडे सोपवतात. त्यावेळी अगदी पैसे देऊन का होईना ती निरुपयोगी गोवंशीय जनावरे परत आपल्या कडे ठेऊन मरेपर्यंत त्यांना शब्बीर मामू सांभाळतात आणि कत्तलखान्यात नेण्यापासून वाचवतात.

गौसेवा ही कोण्या एका धर्माचे कर्तव्य नसून सगळ्यांनी ती करावी, ह्या हेतूने शब्बीर मामुने आज पर्यंत गो वंशीय जनावरांची खूप सेवा केली आहे. आणि ह्यापुढेही सेवा अखंड चालू ठेवायचा त्यांचा मानस आहे. त्यांना मदत करणारे खूप हात पुढे आले आहेत आणि त्यांच्या पुढच्या पिढीलाही गौ सेवा करण्याचे संस्कार मिळाले आहेत. घरातील सगळेच जण आनंदाने ह्या कामात त्यांची मदत करतात.

त्यांच्या ह्या मुक्या प्राण्यांवर दया करण्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.. मात्र शब्बीर मामू मोबाईल फोन वापरत नसल्याने, इंटरनेट सेवेचा वापर करत नसल्याने ह्या बद्दल त्यांना काही माहिती देखील नव्हती. पत्रकारांकडून ही माहिती मिळाल्यावर त्यांना आनंद निश्चित झाला आहे पण ते म्हणतात की कोणताही पुरस्कार मिळावा म्हणून हे कार्य त्यांनी केलेले नाही. तर गौसेवा करून त्यांना खूप समाधान लाभते ह्या साठी त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या घरच्यांचेही सहाय्य त्यांना लाभल्याने हेच कार्य ते नेहमीच करतात राहणार आहेत असे शब्बीर मामू सांगतात.

अशी समाजाची आणि प्राणिमात्रांची सेवा करणाऱ्या ह्या देवासमान असलेल्या शब्बीर मामुना स्टार १ मराठी तर्फे पद्मश्री पुरस्काराच्या शुभेच्छा आणि त्यांच्या ह्या कार्याला सलाम..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!