Loading...

पारंपारिक शेती पद्धती सोडून मशरूमची शेती करा व मिळवा अधिक नफा !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

पारंपारिक शेती पद्धती पासून काहीतरी वेगळे करून, मिळत आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न घेणे हा प्रत्येक शेतकऱ्याचे आवडते काम. कुणाला वाटते त्यांनी तुळशीची शेती करून इप्त्पांना वाढवावं तर कुणी फळांच्या बागा पिक्वव्यात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका शेती बद्दल सांगणार आहोत ज्याने तुम्हाला भरपूर उत्पन्न देखील मिळेल आणि ग्न्ताव्णूक सुद्धा तितकी राहणार नाही.

Loading...

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि मशरूमची शेती व्यावसायिक शेती म्हणून फायदेशीर असू शकते कारण मशरूमच्या शेतासाठी प्रारंभिक खर्च कमी असतो सोबतच आपण लहान प्रमाणात सुरु केल्यास, आपण पार्ट-टाईम जॉब देखील करू शकता.

१. शिक्षण: मशरूमची शेती कशी करायची हे शिकण्यासाठी मशरूम कसे वाढवायचे हे शिकले पाहिजे. अनेक निरनिराळ्या आणि प्रसिद्ध कंपन्या यावर अभ्यासक्रम, शिकवणी वर्ग आणि सेनिमार घेत असतात. त्याला भेट द्या. उदाहरणार्थ, मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर याबातीत परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण देते. तुम्ही कोल्हापूर किंवा कोल्हापूरच्या जवळपास असाल तर नक्कीच भेट द्या.

२. जागा: शिक्षण घेऊन झाल्यावर शोध सुरु करा जागेचा. आपण जसं सुरुवातीलाच बोललो कि कमी प्रमाणात सुरु करायचे असेल तर खूप गुंतवणूक करण्याची गरज नाहीच. १०० किलो मश्रूम जरी उगवायचा असेल तर १०X१० ची जागा पुरेशी आहे; खूप मोठी जागा असण्याची काही गरज नाही. सोबतच ती जागा अशी निवडा जिथे तापमान, आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रित करता येईल. जागेला पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करता येईल.

३. साहित्य:काढ आणि भुसा हे मशरूमची शेती करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे. जर मशरूमची यशस्वी शेती करायची असेल तर तुम्ही स्वच्छता बाळगायला पाहिजे आणि जर स्वच्छता बाळगली नाही तर बहुतांश गोष्टी दुषित होऊ शकतात आणि मग शेतीला त्याचा फटका बसू शकतो. आपल्या वाढत मध्यम म्हणून निर्जंतुकीकरण केलेला पेंढा वापरा. मशरूमचे बियाणे खरेदी करा. शेती शाळेत आणि बाजारपेठेत ते सहजतेने उपब्ध होते. तेही खात्रीशीर आणि कमी किमतीत.

Loading...

४. विक्री: शिक्षण घेतलं, जागा शोधली, साहित्य आणलं आणि शेतीही सुरु केली पण आता उगविलेला माल विकायचा कुठे हा देखील एक प्रश्न आहे. मशरूमचे उत्पादनात परिपक्वता यायला जवळपास ६ आठवडे लागतात. त्यांची कापणी केल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर ते विकून द्यावे कारण ते ताजेतवाने राहते आणि त्यातच जास्त फायदा मिळतो. तुम्ही त्या विक्रीसाठी आपली स्थानिक बाजारपेठ निवडू शकता किंवा किरण दुकानाला आणि रेस्टोरेंटला सुद्धा विकू शकता. ताजे ऑयस्टर मशरूम ८० ते २५० रुपये / किलोच्या दरम्यान विकतात.

ड्राय ऑयस्टर मशरूम ४०० रुपये प्रति किलोग्राम ते ७०० रुपये प्रती किलोपर्यंत विकले जाऊ शकतात. आता जर आपण १०x१० च्या जागेत उत्पन्न घेतलं आणि समजा त्यातून १०० किलो उत्पन्न मिळालं आणि अंदाजे रुपये १०० प्रती किलो भावालाच आपण विकलं तरीही आपण १०००० इतके उत्पन्न मिळवू शकता.

जर आपण ड्राय मश्रूम विक्री केले तर ते ५००० ते ७००० रुपये प्रती बॅच उत्पन्न देऊ शकते. त्याशिवाय आपण मूल्यवर्धित मशरूम उत्पादनांद्वारे अधिक पैसा मिळवू शकता. जे आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात मदत करू शकतात. तर ही होती माहिती मशरूमच्या शेतीची, अपेक्षा आहे तुम्हाला आवडली असेल. जर आवडली तर नक्की शेयर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट करा. या शेतीतल अनुभवी व्यक्ती तुम्हाला नक्की उत्तर देतील.

Mobile Phones

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.