Loading...

तुम्ही म्हणताय शेती परवडत नाही परंतु हा पठ्या काढतोय शेतीतून करोडचं उत्पन्न !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

‘सधन शेती’ ‘सधन शेती’ म्हणतात सगळे, पण नक्की कशाची शेती केली तर ती सधन शेती ठरेल ह्या साठी थोडा विचार करायलाच पाहिजे सगळ्या शेतकरी बांधवांनी. काही ठिकाणी पाण्याची बोंब म्हणून शेतीत नुकसान, काही ठिकाणी जमीन नाही कसदार, तर बियाणं मिळालं खराब म्हणून नुकसान, अशा सगळ्या समस्या आपल्याला नेहमीच त्रास देतात.

Loading...

आता ह्या सगळ्या समस्या तर येतंच राहतात म्हणून हातावर हात ठेवून बसून राहतो का आपण? बरं कष्ट तर शेतकऱ्याला करायलाच लागतात. मग हे सगळे कष्ट वाया जाऊ नये म्हणून काही शेतकरी काहीतरी नवीन नवीन शक्कल लढवतात आणि भरघोस पीक मिळवतात. आता अशा शेतकाऱ्यांची सांगत धरून जर काही प्रयत्न केले तर तुम्हाला पण तितकाच फायदा होऊ शकतो.

पण आपले काही शेतकरी पारंपारिक शेती करून कधी कधी नुकसान सोसतात. आपली माती, पाणी, हवा ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून जरा माहिती गोळा करून जर एखादा वेगळा वाण निवडला तर त्यात निश्चितच फायदा मिळू शकतो ही गोष्ट ध्यानातच घ्यायला पाहिजे बरंका. नाहीतर काहीजण आता शेतीत काही राम नाही म्हणून शेतीकडं पाठ फिरवून कुठं तरी नोकरी धरतात, आणि त्या किरकोळ पगारावर आयुष्य काढतात.

पण जातीच्या शेतकऱ्याचं मन शेतीकडंच ओढ घेतं, खरं सोनं शेतीत उगवतं हे त्याला कळतं, पण वळत नाही, मग वळण्यासाठी एखादी संधी समोर यायला लागते. संधीचं सोनं कसं करायचं हे डोक्यात भिनायला लागतं. आणि हे एकदा का भिनलं की मग करोडपतीच करून देतं. मंडळी… एका हाडाच्या शेतकऱ्यानं हे सगळं करून दाखवलं. अहो रेताड जमिनीतून सोनं काढलं, आता बोला.

राजस्थान मधल्या जैसलमेर चा हा तरुण शेतकरी, शिकून इंजिनिअर झाला, पण शेतीत काही मिळत नाही म्हणून नोकरी धरली. आता नोकरीत कमवून कमवून किती कमवणार? पगार वाढून वाढून किती वाढणार? हे पण गणित त्याच्या डोक्यात चालू होतं. जमीन किती? तर १२० एकर.राजस्थानातली रेताड जमीन, पाण्याचा पत्ता नाही, बाजरी, गहू, नाहीतर मोहरी, एवढंच पीक घेऊ शकत होते.

कडक उन्हाळा, ५० डिग्री तापमान, ह्यात जमिनीतून काय सोनं उगवणार ? म्हणून नोकरी करत होता जैसालमेरच्या म्युनिसिपालटीत. ह्याचं नाव “हरीश धनदेव”, असाच एकदा शेती विषयी सगळी माहिती देणाऱ्या प्रदर्शनात काय काय माहिती देतात म्हणून हा पण गेला बघायला. आणि त्या प्रदर्शनातून बाहेर पडला तो एकदम उत्साही, आनंदी, एखाद्या गोष्टीनं झपाटल्यासारखा तडक घरी आला, आणि शेती करायच्या गप्पा मारायला लागला.

Loading...

मनात विचार पक्का करून झपाटल्यासारखा शेतीच्या कामाला लागला. १२० एकर जमीन भरघोस पिकानं फुलवायची जिद्द त्याच्या कामातून दिसायला लागली होती. हरीश धनदेव ह्या हाडाच्या शेतकऱ्यानं, आपल्या शेतात एका वेगळ्या वाणाचं उत्पादन घ्यायचं त्यानं निश्चित केलं, कोणता वाण होता तो? “कोरफड” (ऍलोवेरा) ह्या वाणाचं उत्पादन. ८०,००० रोपं त्यानं सुरुवातीला आपल्या १२०एकर जागेत लावली.

त्याच रोपांची वाढ होऊन आता त्यांची संख्या ७लाख झाली आहे. राजस्थानच्या वाळवंटात ही शेतीतली कमाल पाहायला जरूर जाऊन या. ह्या कोरफडीला मागणी आज असंख्य ठिकानांवरून आहे. वळवंटातली ही कोरफड अतिशय उत्तम दर्जाची आहे. रामदेव बाबांच्या पतंजली च्या काही विशेषज्ञांनी ह्या कोरफडीची पाहणी केली आणि आज हरिशची ही कोरफड पतंजलीला सप्लाय केली जाते आहे.

आता हरिशने त्याच्या नोकरीला रामराम केला आहे..गेल्या चार महिन्यात सुमारे १५० टन ऍलोवेरा एकट्या पतंजलीला सप्लाय केली आहे. कोरफडीला आणखी ब्राझील, हॉंगकॉंग, आणि अमेरिका ह्या देशांतून भरपूर मागणी आहे. त्यामुळे हरीश धनदेव ने जैसलमेर पासून ४५किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिसर ला स्वतःची ‘नॅचरल ऍग्रो’ नावाची कंपनी सुरू केली आहे आणि तिथून हया कोरफडीचा पुरवठा केला जातो. ह्या ऍलोवेरा प्रोसेसिंग साठी हरिशने आधुनिक मशिनरी सुद्धा मागवून प्रोसेसिंग युनिट सुरू केलं आहे.

आता हरीश धनदेव ची ह्या उत्पादनातून वर्षाकाठी सुमारे २कोटी ची उलाढाल व्हायला लागली आहे. बाकी इतर राष्ट्रांना सुद्धा ही कोरफड पुरवता आली तर हरीश धनदेव हा धन घेव म्हणेल अशी आशा व्यक्त करूया, आणि त्याच्या पुढच्या यशाला शुभेच्छा देऊया. जर हरीश रेतीतून सोनं काढू शकतो तर आपण आपल्या सुपीक जमिनीतून असले वेगळे उत्पादन निश्चितच घेऊ शकतो. मग काय लावा डोकं, विचार कसला करताय ? लागा कामाला.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.