Loading...

पुण्यात भाजपला धक्का, हडपसरमधून हा उमेदवार विजयी!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

हडपसर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी दणदणीत विजय मिळवला असल्याचं वृत्त आल आहे. पुण्यात गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने यावेळेस पुण्यात खात उघडल आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांचा 7500 मतांनी विजय मिळवला आहे. तुपे यांच्या विरोधात भाजपने विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली होती. तर मनसेने ही वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले होते. मात्र या दोन्ही नेत्यांना चुरस देत चेतन तुपे यांनी विजय संपादन केला आहे.

 

Loading...

दरम्यान राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या योगेश टिळेकर यांनी 82 हजार 629 एवढी मते घेत विजय मिळवला. हडपसर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे महादेव बाबर होते. त्यांना 52 हजार 381 मते मिळाली. आणि त्यांचा 30 हजार 248 मतांनी पराभव झाला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे हे तिसऱ्या क्रमांकावर होते.

UPDATE

Loading...

  • भाजप : 100
  • शिवसेना : 64
  • कॉंग्रेस : 41
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 54
  • वंचित : 1
  • मनसे : 0
Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.