चुकून सुद्धा खरेदी करणार नाही ह्या गोष्टी, जर तुम्हाला कळलं की ह्या कशा तयार होतात…!

0

आपण ग्राहक म्हणून अनेक खाण्याच्या गोष्टी दुकानातून किंवा मॉल मधून खरेदी करून आणतो, कारण त्या आपल्या गरजेच्या, किंवा आवडीच्या असतात म्हणून नेहमी विकत आणतो. पण त्या कुठे आणि कशा बनवल्या जातात हे त्या दुकानदाराला, किंवा मॉल वाल्यांना माहिती नसते. सुंदर पॅकिंग असल्यामुळे त्या चांगल्याच असतील असं आपण समजतो आणि घेऊन येतो. बनवणारे कसे बनवतात हे आपल्याला कळतंच नाही म्हणजे त्यात कोणत्या गोष्टींचा वापर करतात हे आपण कशाला पाहतो ?.

१ औषधे: आजारी पडल्यावर डॉक्टर काही औषधं लिहून देतात ती आपण दुकानातून आणतो आणि घेऊन टाकतो. त्यात काही वेळा कॅप्सूल्स असतात, ह्यात आत औषध असते पण बाहेरचे आवरण कशाचे बनलेले असते? ते प्लास्टिक सारखे दिसते पण ते प्लास्टिक नसून जिलेटीन चे बनवलेले असते आणि हे जिलेटीन डुकराच्या , किंवा बैलाच्या (सांड) चरबी, मांस , आणि हाडे ह्यापासून बनवलेले असते. आपल्या देशातल्या किती नॉन व्हेजिटेरियन लोकांना हे माहिती असेल?

२ दुसरी गोष्ट म्हणजे ‘प्रोसेसज्ड फूड’ ब्रेड, केक, वगैरे पदार्थ बनवताना हलकी सगलीकडे मशिन्स वापरली जातात.म्हणून ते पदार्थ हाईजिनिक समजले जातात आणि सर्रास आपण ते खातो. पण हे पदार्थ बनवताना त्यात जो आटा असतो तो तयार होताना त्यात एल सिस्टीन ( L Systien) नावाचा पदार्थ मिसळला जातो. तो कशासाठी? तर तयार झालेला ब्रेड, किंवा केक कायम नरम राहावा म्हणून एल सिस्टीन वापरले जाते. हे एल सिस्टीन कशापासून बनलेले असते माहितीये? हे स्त्रियांच्या लांब लांब केसांपासून बनवले जाते. हे कळल्यावर काय वाटेल तुम्हाला? पण हे एल सिस्टीन वापरले जाते. आणि आपण हे केक, ब्रेड राजरोसपणे खातो आहोत.

३ तिसरा पदार्थ म्हणजे ज्याचं नाव घेतलं की तोंडाला लगेच पाणीच सुटतं, तो म्हणजे, पाणी पुरी आणि शेव पुरी. ह्या पुऱ्या ज्या ठिकाणी बनतात ते ठिकाण सगळ्यांनी एकदा तरी बघून यावं इतकं प्रेक्षणीय असतं . कुठल्यातरी अंधाऱ्या छोट्याशा जागेत ह्या पुऱ्या बनतात. अनेक किलोचे पीठ मळून मोठ्या प्रमाणावर ह्या पुऱ्या तयार होतात त्यामुळे हे पीठ हाताने मळणे अवघड असते त्यामुळे पायाने हे तुडवून मळले जाते सरळ फरशीवर, मग फरशीवरची धूळ, बॅक्टेरिया, ह्या गोष्टी आपोआप मिसळल्या जातात आणि चविष्ट पुऱ्या बनवल्या जातात. पिठाचा मोठा गोळा तयार होतो त्याच्या पुऱ्या व्हायला बराच वेळ लागतो तोपर्यंत हजारो माशा त्या पिठाचा स्वाद घेत असतात. पुऱ्या जमिनीवरच ठेवल्या जातात आणि कोणत्याही कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या तेलात त्या तळून घेतल्या जातात. ते तेल पार काळं होईपर्यंत अनेक वेळा त्याच तेलात पुऱ्या तळल्या जातात. प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केल्यावर त्या पुऱ्यांवर इतके संस्कार झालेले आपल्याला कुठे कळतात. आपण त्या अहाहा करत फस्त करतो.

४ चौथे बटाट्याचे वेफर्स, हे सुद्धा रोज खाणारे लोक आहेत. आणि हे मोठे लोक लहान मुलांना सुद्धा ह्या वेफर्स खाण्याची सवय लावतात. कधीतरी खायला हे काही त्रासदायक नाहीत पण नेहमी खाणे का धोकादायक आहे ते पहा म्हणजे कळेल. मुख्य म्हणजे चप्स मध्ये फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, आणि सोडियम ह्या तीनही गोष्टी जास्त प्रमाणात असतात त्यामुळे पोटाचा घेर वाढायला मदत होते. आता काही चिप्स ह्या हवा भरल्याप्रमाणे फुगलेल्या पॅकेट्स मधून विकली जातात त्यात सोडियम बाय सल्फेट चा वापर केला जातो, कारण जास्त दिवस टिकण्यासाठी आणि फ्रेश दिसण्यासाठी हे वापरतात. हे सोडियम बाय सल्फेट , केसांचा शॅम्पू, फेस वॉश, किंवा अँटी फंगल क्रीम मध्ये वापरले जाते कारण बॅक्टेरिया मारणे हा हेतू असतो , आणि ते नेहमी खाल्ले तर काय होईल ह्याचा विचारच घाबरवून सोडतो.

५ चुईंगम खाण्यामुळे दात स्वछ राहतात, आणि माऊथ फ्रेशनर म्हणून सारखे चघळणारे भरपूर लोक आहेत पण हे चुईंगम कशाचे बनते हे माहिती आहे का? हे बनते रबरा पासून. रबर म्हणजे गाडीच्या टायर मध्ये वापरले जाणारे रबर. फक्त ते पातळ करून त्याला जास्त लवचिकपणा आणला जातो त्या अतिशय पातळ रबरात मिंट, स्ट्रॉबेरी, असे वेग वेगळे फ्लेवर घालून साखरे बरोबर एकजीव करून बनवले जाते . असे हे रबर आपण कितीतरी तास चघळत बसतो. जोपर्यत ते तोंडात असते तोपर्यंत काही हानी नाही करत पण चुकून गिळले गेले तर किती तरी महिने ते पोटात मुक्काम करू शकते. कारण रबर आणि प्लास्टिक ह्या गोष्टी आपल्या पोटात पचल्या जात नाहीत , त्या तशाच चिकटून राहतात.

ह्या सगळ्या घातक पदार्थांचे सेवन आपण राजरोस करतो पण कशापासून, कसे, कुठे बनतात हे कळल्यावर मात्र विचारच करायला हवा नाही का..? तुम्हाला या बद्दल काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!