Loading...

सकाळी चहा पिण्याऐवजी जि-याचे पाणी पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सकाळी साखरझोपेतून उठल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटतो तो पहिल्या धारेचा उकळता, वाफळता चहा. गरमागरम फक्कड चहा प्यायल्याने लोकांची दिवसाची छान सुरुवात होते. पण तुम्हाला माहित आहे का उपाशीपोटी सकाळचा चहा प्यायल्याने तुमच्या शरीरावर त्याचे फार घातक परिणाम होतात. अशा वेळी शरीराला फायदेशीर अशा द्रव्य पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. चहा हा तेवढ्या वेळापुरता जरी छान वाटत असला तरी त्याचे कालांतराने आपल्या शरीरावर होणारे परिणाम घातक असतात. म्हणून चहा ऐवजी काही ज्यूसेस किंवा अगदी गरम पाणी पिणे जास्त फायद्याचे ठरेल. यातही शरीरास सर्वात चांगला द्रव पदार्थ म्हणजे जि-याचं पाणी.

सर्वसाधारणपणे जिरं पोटाचे विकार, गॅस, अॅसिडीटी यांसारख्या अनेक आजारांवर फायदेशीर ठरते हे आपल्या सर्वांना माहित असेलच. मात्र याच जि-याचं पाणी रोज सकाळी उठल्यानंतर प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Loading...

सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी का प्यावं?

  • 1. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळेल
  • 2. जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीज खूप कमी असतात, एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात
  • 3. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तर जिऱ्याचं पाणी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
  • 4. दररोज सकाळी जर एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगनीज, मिनरल्स मिळतात.

कसं तयार कराल जिऱ्याचं पाणी?

एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं टाका आणि रात्रभर ठेवा. शक्यतो तांब्याच्या भांड्यात हे पाणी ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या.

अशा पद्धतीने जि-याचं पाणी प्यायल्याने शरीराला खूपच फायदेशीर ठरेल. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल जेणेकरुन तुम्ही दिवसभर छान सक्रिय राहाल.

Loading...

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.