Loading...

हार्ट अटॅक येण्याच्या १५ दिवस आधी शरीर देते ‘हे’ संकेत…

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सध्या हार्ट अटॅक येण्याच्या प्रमाण वाढले आहे.पण तुम्हाला कदाचित माहित नसेल कि,तुम्हाला बॉडी जे काही संकेत देते त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या जीवावरही बेतू शकते.हार्ट अटॅक जरी अचानक येत असेल तरी,अनेक दिवसांपूर्वीच याचे संकेत दिसून येतात. अनेकवेळा हार्ट प्रॉब्लेमच्या संकेतला गॅस किंवा मसल्स पेन समजून इग्नोर केले जाते परंतु हे संकेत वारंवार दिसून आले तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

Loading...

श्वास कमी घेतला जाणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे हार्ट अटॅकचं मोठं लक्षण मानलं जातं. हार्ट अटॅक येण्यापूर्वी ६ महिने पुरुष आणि महिलांना हे लक्षण दिसतं. अशात चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या होतात. 

वारंवार छातीत किंवा वरच्या भागात दबाव जाणवणे ,अचानक गर्मी किंवा थंडी होणे असे तुम्हाला वारंवार होत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नको.हा कदाचित हार्ट अटॅक येण्याच्या संकेत असू शकतो.

असामान्य थकवा हा हार्ट अटॅक येण्याचं मुख्य लक्षण मानलं जातं. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अशाप्रकारचं लक्षण होण्याची अधिक शक्यता असते. या लक्षणाकडे सहज कुणीही दुर्लक्ष करतं. कधी कधी सोप्या आणि साध्या कामांमुळेही थकवा जाणवतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. 

डाव्या बाजूच्या बरकड्यांवर किंवा छातीत मधोमध दुखणे आणि काही मिनीटांनी स्वस्थ वाटणे.वारंवार डोके,मान,पाठ,पोटाच्या वरचा भाग किंवा विनाकारण दात दुखत असतील तर कदाचित हार्ट अटॅक येण्याच्या संकेत असू शकतात.

पोटात दुखणे, मळमळ होणे आणि सतत पोट खराब होणे हे सर्वात सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये समान रुपाने दिसतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी पोटात दुखू शकतं. कधी कधी पोटात थांबून थांबून दुखतं. शारिरिक तणावामुळेही पोटात दुखतं. 

Loading...

अपचन ,उलटी होणे किंवा सतत जीव घाबरणे यापैकी कोणतेही संकेत तुमची बॉडी तुम्हाला देत असेल तर दुर्लक्ष न करत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या,अन्यथा जीवावर बेतू शकतो.

झोप न येणे ही समस्याही हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकच्या वाढत्या समस्येशी संबंधित आहे. ही समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. झोप न येण्यामागे चिंता आणि तणाव हे मोठं कारण असू शकतं. याच्या लक्षणांमध्ये झोप येण्याची अडचण येणे, झोप आली तर ती फार जास्त वेळ न लागणे अशा गोष्टी येतात. 

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.me’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.