किशोरी आणि हीना मध्ये कोणाबद्दल होते आहे चर्चा ?

0

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमधील नाती, त्यांचे एकमेकांबद्दल असलेले मत क्षणात बदलताना दिसत आहे… हीनाने किचन मध्ये घातलेल्या वादावरून किशोरी आणि हीना मध्ये बरीच चर्चा रंगली… किशोरी यांचे म्हणणे आहे कितीपण बोलो तरी तोंड फाटयांचं तोंड आपण शिवू नाही शकत, मी माझा मुद्दा मांडला, बोलणारे बोलतच राहतात, त्याचे काय करायचे… तर हीना म्हणाली असच वागायचे, जशी मी वागते… आपण बोलायचं, आपण कोण आहे आपल्याला माहिती आहे ना.

अशा लोकांना मी पायात ठेवते माझ्या” असे attitude दिले तर मी पण बोलते… अभिजीत कॅप्टन आहे… ते असून देखील तो काहीच उपाय नाही देऊ शकला, जेंव्हा कि त्याने ते द्यायला पाहिजे होते. जिला चपाती हवी होती तिला तर मिळालीच नाही, आणि दुसरीला करायची नव्हती. जर मला शनिवारी सर काही बोले तर मी मुद्दा मांडणार “मी आहे जिद्दी, तुम्हांला नसेल पटत जा घराबाहेर मी या घरामध्येच रहाणार आहे”. किशोरी म्हणाल्या हेच तर आहे तू मान्य करतेस तू जिद्दी आहेस बाकीचे सदस्य मान्य नाही करत. त्यावर हीना म्हणाली, “आवाज माझ्याकडे सुद्धा आहे, मी गुंगी नाहीये. मी जिथल्या तिथे बोलते आणि फैसला करते”.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!