Loading...

कोण आहे ‘हिंदुस्थानी भाऊ’? जाणून घ्या त्याचा प्रेरणादायी प्रवास…

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

विकास पाठक (Vikas Pathak) हे नाव ऐकून तुमच्या डोळ्यासमोर कोणी आलं का? मग ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हटल्यावर नक्कीच तुमच्या नजरेसमोर नक्कीच एका तरुणाचा चेहरा आणि त्याच्यावरचे मीम्स धडाधड आले असतील. ‘पहले फुर्सत में निकल’ असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा पठ्ठ्या ‘बिग बॉस 13’मध्ये (Youtube Sensation Hindustani Bhau) झळकत आहे.

Loading...

विकास पाठक उर्फ बबलू पाठक असे त्याचे खरे नाव आहे. आणि भाऊ हा मराठी आहे तो मुंबई मध्ये राहतो. सध्या भाऊ हा बिग बॉस मध्ये आला आहे आणि आपल्या कामाने सर्वाचे मन जिंकत आहे. बिनधास्त स्वभाव आणि आपली बोलण्याची शैली याच्या मुळे भाऊ बिग बॉस मधील स्पर्धकांना देखील आवडत आहे.

‘हिंदुस्तानी भाऊ’बाबत अनभिज्ञ असलेले मोजकेच नेटिझन्स असतील. विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात तो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. विकासने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 35 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला आहे.

Loading...

लहान वयातच विकासवर घरची जबाबदारी पडली होती. विकासचं शिक्षण सातवीपर्यंतच होऊ शकलं. वडिलांची नोकरी सुटल्यामुळे सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात 20 रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी त्याने धरली.

त्यानंतर त्याने बारमध्ये वेटर म्हणून काम केलं. लोकलमध्ये आणि दारोदार जाऊन अगरबत्त्याही विकल्या. चायनीजच्या गाडीवरही भाऊने काम केलं आहे.

साईबाबांना भाऊ श्रद्धास्थानी मानतो. साईबाबांसोबत संजूबाबाही त्याला आवडतो. संजय दत्त हा विकासचा आवडता अभिनेता आहे. संजूबाबाची स्टाईल भाऊच्या (Youtube Sensation Hindustani Bhau) व्हिडीओंमधून डोकावते, यात नवल नाही.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.