यु ट्यूबचा अशा तऱ्हेने वापर करायचा की तुमच्या खात्यात आले पाहिजेत पैसेच पैसे..

1

सध्या स्वतःच्या करामती व्हिडीओ रूपाने लोकांसमोर आणायच्या ऍप्स जोरदार पेव फुटलं आहे. जो तो आपले मजेशीर व्हिडीओ बनवतो आणि सोशल मीडिया वर पोस्ट करतो. काही जण तर सोशल मीडिया वरचे सेलिब्रिटी बनले आहेत. पण ही फुकाची प्रसिद्धी काय कामाची..?? बॉलीवूड चे सेलिब्रिटी खोऱ्यानं पैसे कमावतात त्यामुळे सेलिब्रिटी असण्याचा त्यांना फायदा आहे. खरे तर तुमच्यामध्ये असलेल्या कला सादर करून तुम्ही देखील थोडा फार पैसे कमवू शकता. यु ट्यूब तुमच्या व्हिडिओसाठी तुम्हाला पैसे देईल.. म्हणजे यु ट्यूब वर जर तुमचे चॅनेल असेल तर त्याला बँक अकाउंट जोडा आणि पहा कशी लक्ष्मी येते.

तर मंडळी आज आम्ही तुम्हाला काही कान मंत्र देतो ते लक्ष देऊन वाचा आणि कमवा यु ट्यूब वरून ‘डॉलर्स’…!!

१. तुमच्या गूगल च्या अकाऊंटच्या मदतीने आधी यु ट्यूब चे चॅनेल सुरू करा. तुम्हाला कोणती कला सादर करायची आहे तेही ठरवा. पण काहीतरी युनिक नक्कीच असलं पाहिजे तुमच्या कडे नाहीतर यु ट्युबच्या भाऊगर्दीत हरवून जाल ना..!! २. युझर फ्रेंडली कँटेंट हा सोशल मीडियावर जोरदार चालतो. हलके फुलके व्हिडीओ खूप हिट्स घेतात. अर्थात तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सुद्धा चांगली हवी. एच डी असल्यास उत्तम. करण कमी रेजोल्युशन चे व्हिडीओ सहसा कोणी पाहत नाही.

३. तुम्ही बनवलेले व्हिडीओ यु ट्यूबवर अपलोड करा. आता महत्वाचे आहे ते ह्या व्हिडीओज वर व्ह्यूज येणे. तुम्हला कँटेंट चांगला असेल तर तुम्हाला भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स मिळतील. पण ह्यात सातत्य पाहिजे. म्हणजे तुम्हाला सतत व्हिडीओ अपलोड करावे लागतील. आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला दर्शन द्यावेच लागेल आणि व्ह्यूज ची कमाई करावीच लागेल. ४. बरे अजून एक महत्वाचे म्हणजे तुम्ही मीडियाचे कायदे, कॉपी राईट ऍक्ट ह्या सगळ्यांचा अभ्यास करून ठेवा हं.. मुख्य म्हणजे तुमचा कँटेंट सुद्धा एकदम ओरिजिनल ठेवा. कुठला कॉपी केलेला नको.

५. व्हिडीओ तर टाकले पण त्यावर व्ह्यूवर ट्राफिक कशी मिळवावी बरे..? उसमे क्या है..!! हे तर सोप्प आहे. तुमच्या व्हिडीओ बद्दल छानसं डिस्क्रिप्शन लिहा. ह्यामध्ये की वर्ड टॅगिंग देखील करावे. म्हणजे असे शब्द घालावेत की कोणी त्या शब्दाला शोधत असल्यास तुमचे व्हिडीओ सर्च मधये अग्रस्थानी येतील. तुमचे व्ह्यूवर्स वाढतील आणि तुमचे व्हिडीओ हिट होतील. ६. आता एखादं प्रॉडक्ट बनवलं तर त्याची विक्री करावी लागते. नाही हो तुम्हाला ‘दर दर की ठोकरे’ खात भटकावे नाही लागणार. फक्त इतर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून घ्या म्हणजे झालं.. अहो फेसबुक, ट्विटर ह्यावर आपल्या यु ट्यूब चॅनेल च्या लिंक टाकायच्या. फेअबुक वर एक पेज बनवायचं आणि यु ट्युबचे सगळे व्हिडीओ त्यावर पोस्ट करायचे. म्हणजे आपसूकच ट्राफिक तुमच्या चॅनेल ला मिळेल.

७. आपल्या चॅनेल संदर्भात प्रश्न स्वतःच बनवून quora, afaqs अशा साईट्स वर आपणच उत्तरे ही द्यायची. जे वाचून व्ह्यूवर्स तुमच्या चॅनेल कडे आकर्षित होतील. ८. बरं हे सगळं केल्यावर मुख्य काम करायचं म्हणजे ‘मोनेटायझेशन प्रोग्रॅम’ मध्ये दाखल व्हायचं..!! पण खरी गोम अशी आहे की हे तुमचे १० हजार व्ह्यूज बांल्याशिवाय तुमच्यासाठी खुले हो नाही. एकदा का १० हजाराला एकदा गेला की बिनधास्त अपप्लाय करा. आणि २ दिवस वाट पहा. अप्रुव्हल म्हणजे त्यांच्या कडून होकार आला की तुमची पैसे कमवायची टाकसाळ सुरू.

९. पण ह्यात चिकाटी मात्र हवी. करण प्रत्येक व्हिडिओला १० हजार व्ह्यूज हवेत आणि ते झाले की प्रफएक वेळी मॉनेटायझेशन प्रोग्रॅमचे दार वाजवावे लागते. जेव्हा जेव्हा अप्रुव्हल मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू… १०. यु ट्यूब कडून मॉनेटायझेशनसाठी अप्रुव्हल मिळालं रे मिळालं की गुगलच्या अडसेन्स वरून तुमचे बँक खाते जोडून घ्या. तुमच्या यु ट्यूब खात्यात १०० डॉलर जमा व्हायची वाट पहा. जेव्हा हा आकडा दिसेल तेव्हा गूगल तुम्हाला भारतीय पैशांमध्ये ते डॉलर्स बदलून देईल. १०० डॉलर म्हणजे साधारण ६५०० रुपये. अर्थात हे पेमेंट व्हेरिफिकेशन पिन सेक्युअर्ड आहे. हे पैसे कमवायचे साधन जरा संथ आहे. पण तुम्हाला लाखोंत पैसे कमवायचे झाल्यास तुम्हाला ब्रॅण्डस बरोबर हातमिळवणी करावी लागेल. पण मग व्ह्यूज देखील ब्रँडच्या हिशोबानेच..!!

बघा तर ह्यात आपले नशीब आजमावून. करा सुरुवात यु ट्युबर बनायला. कारण कोणीतरी म्हटलेच आहे नथिंग इस इम्पॉसीबल..!!

लेखिका – सोनिया हसबनीस-सावंत

1 Comment
 1. Abhishek dikondiwar says

  कोणी मान्य करो अथवा ना करो पण ,जर हाच वडापाव बाहेर देशातून आला असता ना तर आपण त्याला खूप भाव दिला असता,जसा आपण पिझा आणि बर्गर ला देतो पण असे किती पण डिश आलेत ना तरी वडापाव ला पर्याय नाहीच… सुरवात जरी वडापाव ची मुंबईत दादर ला झालीय झाली तरी आज तो लंडन पर्यंत पोहचलाय…. फक्त कष्ट करणाऱ्यांचा पोट पोट भरायचं साधन न राहता आज तो लक्झरी होत चालाय….
  पुण्यात तर जम्बोकिंग ने वडापाव ची वेगळीच उंची गाठलीय…एवढं आहे की आता लोक सुद्धा किमतीला न बघता चांगलं जे आहे त्याला प्रतिसाद देतायत …

  वडापाव जलद बनणाऱ्या पदार्थात येतो..मला तर जाम आवडतो
  सगळे पदार्थ एकीकडे आणि वडापाव एकीकडे …आयुष्य सुंदर आहे याची खात्रीच तेव्हा मिळते जेव्हा मस्त छानशा मी खमंग वडापाव मला खायला मिळतो
  मी तर 12-15 किलोमीटर लांब फक्त वडापाव खायला जातो… आणि या आवडी मुळेच मी वडापाव करायला शिकलो…. आठवड्याला वेळ काढुन मी नवीन कुठे वडापाव सेंटर सुरू झालंय तिथे हमखास जातो आणि त्या वडापाव मध्ये वेगळं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो …प्रत्येकाची वेगळी काहीतरी खासियत असते…..पण वडापाव मध्ये आणखी एक महत्वाची गोस्ट आहे ती मंझें त्या सोबत मिळणारी चटणी एवढं भारी comibimation कस काय बनवतात काय माहीत

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!