पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का!

0

देश आक्रोशात आहे. “मला सुद्धा सुसाईड बॉम्बर म्हणून तिथे पाठवा, मी त्यांच्या खात्मा करतो” “मी पुन्हा एकदा सैन्यात यायला तयार आहे; भारत मातेसाठी जीव द्यायला तयार आहे” “माझा दुसरा मुलगासुद्धा मी देशासाठी बहाल करतो” असे उद्गार देशातील नागरिकांच्या तोंडून निघत आहेत. देश आता पूर्णपणे चिडलेला आहे. सगळ्यांना फक्त बदला हवाय.

पुलवामा येथील भ्याड दहशतवादी शहीद झालेल्या भारत मातेच्या पुत्रांचा सूड हवाय. त्या ४० जवानांच्या रक्ताच्या बदल्यात ४००० लोकांचं रक्त पाहिजे आहे. भारत सरकार, जम्मू पोलीस, सीआरपीएफ, भारतीय सेना; प्रत्येक जन आप-आपल्या परीने सूड घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातच थोडी भर पडली ती भारतीय हॅकर्सच्या करणीने.

पुलवामा हल्ल्याचा सूड म्हणून भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानवर आपला सायबर हल्ला चढविला आणि त्यांच्या २००हून अधिक वेबसाईट हॅक केल्या. ही हॅकिंग भारतातील आय-क्रूद्वारा करण्यात आली आहे असं दिसते.

आय-क्रूने पाकिस्तानी वेबसाईट हॅक त्यांच्या वेबसाईटवरील पूर्ण माहिती मिटवून तिथे भारतीय जवानांना आदरांजली वाहिल्याचे दिसून पडत आहे. तिथे एक जळत असलेली मेणबत्तीही दिसते. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.

पेजवर लिहिलं आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली. तसेच याशिवाय असाही मेसेज लिहिण्यात आला आहे की, 14/02/2019चा हल्ला आम्ही विसरणार नाही. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो.

तुमच्यानुसार, देशभक्ती-युद्ध-जिहाद- शिट, असाही मेसेज या हॅक करण्यात आलेल्या पेजवर पाहायला मिळतोय. पाकिस्तानी सायबर जगावर केला गेलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही वेबसाइट हॅक करण्यात आली होती.

दक्षिण जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला केला होता. हा एक भ्याड आत्मघाती हल्ला होता आणि त्यात सेआरपेफच्या ४० जावांना वीरमरण प्राप्त झाले. पाकिस्तानातील दहशतवादी संगठन जैश-ए-मोहम्मदने हा हल्ला घडवून आणला होता आणि आता आम्हाला त्या हल्ल्याचा बदला हवाय.

आज सकाळी सकाळी मिळालेल्या बातमीनुसार २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलेलं आहे पण हे पुरेसं नाही. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!