Loading...

काल फक्त सामना हरलाय पण अक्खा भारत जिंकला !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

जिकणं आणि हरणं हे तर आयुष्याची रीत आहे. जी कितीही काही केलं तरी मोडू शकत नाही. जगण्याला दोन बाजू गोचिडासारख्या चिकटलेल्या असतात. एक जगण्यात जिकणं आणि जिंकून कधीतरी पुन्हा हरणं. त्यातली एक जरी हरवली तरी जीवन एकतर्फी जगूच शकत नाही. मग त्यात या जगातली कोणतीच गोष्ट वर्ज्य नाही. क्रिकेट तर हा एक खेळ ये. खेळात हार किंवा जीत हे असतचं.  ते असलं तर त्यात मजा ये.

९ जुलै २०१९ चा दिवस उजाडला. करोडो भारतीय चाहत्यांच्या आशा ,आकांक्षा सर्व काही या दिवशी जोडलं गेलेलं होतं. भारतीय लोकांसाठी क्रिकेट म्हणजे आयुष्य आणि आयुष्य म्हणजे क्रिकेट असं काहीसं एक समीकरण चं बनून गेलंय. आणि ९ जुलै च्या दिवशी जणू ह्या समीकरणाची सोडत सांगता होणार होती. खेळ होणार होता. आणि त्या खेळाचा निकाल लागणार होता. भारतीय लोकांना निकालाची खुप उत्सुकता असते. मग ते राजकारणाचा निकाल असो किंवा क्रिकेटच्या मॅच चा !

Loading...

मागील काही मॅच मध्ये अप्रतिम खेळ करून भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही संघ उपांत्य फेरीत एकमेकांनसमोर लढणार होते. १९८३ चा वर्ल्डकप जिंकल्या नंतर दोन वेळा उपांत्य फेरीत हरून पुन्हा त्याची पुनरावृत्ती भारताला करायची न्हवती. आणि हातातोंडाशी आलेला घास केन विल्यम्सन च्या संघाला सोडायचा न्हवता. महेंद्रसिंग धोनी च्या नेतृत्वाखाली खाली वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न बऱयाच काळानंतर भारतीय संघानी साकार केलं होतं.

त्याच माही च्या मार्गदर्शनाखाली आणि विराट असणाऱ्या कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ २०११ ची मात्र पुनरावृत्ती करायला सज्ज होता. दुपारी ठीक ३ वाजता सामना सुरू झाला. पहिल्याचं अंकात भारत मात्र पिछाडीवर गेला. खेळ ज्या मैदानावर खेळायचा आहे ते मैदान आधी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फलदायी होतं. मात्र भारत नाणेफेक हरला. आणि तिथंच थोडी चुनचन भासायला लागली. पण परिस्थिती अवजड जरी असली तरी लढणार नाही तो ” भारतीय संघ कुठला ” गोलनंदाजानी अप्रतिम गोलंदाजी करून विरोधी संघाला अक्षरशः सुरुवातीला गुढघे टेकायला लावले. पण व्यत्यय आनणारा पाऊस आला. सगळं चित्र पालटलं. मॅच दुसऱ्या दिवसाला ढकलली.

पुन्हा दुसऱ्या दिवशी भारताने न्यूझीलंड ला २५० च्या आतच रोखलं. पण जेव्हा भारतीय संघ खेळायला आला. तेव्हा करोडो चाहते जल्लोष करताना दिसत होते. कारण समोर हिटमॅन होता. सगळ्यांचा रोहित होता. पण एकामाघून एक विकेट जात भारत ९६-५ ह्या धावसंख्येवर पोहचला. काहींच्या आशा मावळल्या होत्या. पण अजून खेळ बाकी होता. कारण धोनी आणि धोनी सोबत ” सर जड्डेजा ” होता. सगळयांना माहीत होतं की आजपर्यंत दोघेही ज्या ज्या वेळीस देशाला गरज होती त्या वेळीस प्रतिकूल- अनुकूल खेळ करून जिकण्याच्या लढाईत जिवंत ठेवत होते.

तोंडाशी आलेला घास ओढून घेतलेल्या न्यूझीलंड ला मात्र दोघांनी राहुल द्रविड च्या खेळाची आठवण करून दिली. अशी भिंत दोघे बनले की काही काळ का होईना पण भारत व भारतीय चाहते जिंकले होते. सर जड्डेजा नी आधीच्या सर्व आऊट झालेल्या फलंदाजाला लाजवील असा उत्कृष्ट खेळ केला. आणि माही नी त्याच्यासोबत शेवटपर्यंत संयम काय असतो ? हे समजावून सांगितलं. सर जड्डेजा नी भारतासाठी आशा जिवन्त करून सगळी सूत्र धोनीच्या हाती हे ” नशिबाला न मिळालेल्या साथीमुळे ” सोडून माघारी परतला.

Loading...

पण कितीही कणखर काळ असला तरी ” अनहोनी को करें होनी ” तोच आपला धोनी. शेवटच्या क्षणापर्यंत समोरच्या संघाचा घास करोडो भारतीय चाहत्यांचा तोंडात मायेनं धोनी भरवीत होता. पण लढता लढता एका अप्रतिम खेळ करणाऱ्या धोनीच्या खेळाचा आणि भारताच्या आशा ,आकांशा बाकी सर्व काहींचा अंत झाला. माणूस आहे धोनी सुद्धा ! आपल्यासारखाचं ! लढता लढता माघारी परतलेल्या धोनीच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण भारतीय चाहत्यांचा जीव अभिमानाने फुलला होता.

कालचा सामना आपण जरी हरलो असलो. पण खरं बोलायचं झालं तर क्रिकेट आणि भारत मात्र जिंकला. कारण खेळ काय असतो ? कसा असतो ? हे समजून देणारा धोनी आणि जड्डेजा मात्र भारतीय चाहत्यांच्या मनात हिरो झाले होते. ते काल ही हिरो होते , आजही हिरो होते आणि उद्याही तेच हिरो राहणार. आज भारतीय गर्वाने सांगतोय की आम्ही ” हरलो पण जीव तोडून तितकंच लढलो ” वाघांनो तुमच्या खेळाला करोडो भारतीय यांचा कडक सलाम ! ऐसें ही खेलते रहो और हमारे साथ आप भी खेल को जितें रहो !

तुमच्या हरहुन्नरी खेळामुळे तुम्ही हरून सुद्धा आमची मान ताठ केली. याबद्दल एक भारतीय म्हणून आम्हाला तुमचा सच्चा गर्व आहे !

लेखक :- कृष्णा विलास वाळके

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.