Loading...

जर इंग्रज भारतात आले नसते तर आज भारतावर यांचं राज्य असतं !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

सलग १५० वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. नुसतं राज्यच केलं नाहीतर भारताला अक्षरशः लुटलं. भारतात लुटण्यासाठी होतं काय ? तर स्वतः ची नसलेली विचार पद्धती. नेहमी दुसऱ्यांच्या विचारांवर चालत आलेला भारता ची इंग्रजांनी नस ओळखली आणि राज्य करायला सुरुवात केली. भारतातल्या केरळ मधले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सांगितल्या प्रमाणे जर भारतावर इंग्रजांच राज्य नसतं तर ते कुणाचं असतं ?

Loading...

मराठा साम्राज्याची धमक ही साऱ्या भारतात होती. कितीतरी मराठा राजे हे आजही इतिहासात स्वतः च्या कार्याची नोंद करून गेले आहेत. त्यामुळे शशी थरुर यांनी ज्या व्हिडिओ मध्ये असं म्हंटल की मराठा लोकांचं या देशावर राज्य असतं जर इंग्रज भारतात आले नसते तर!… भारतीय लोकं बलवान होते म्हणून शशी थरूर यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. जर मराठ्यांच राज्य असतं तर धार्मिक सहिष्णुता ही शांत असती.

ते म्हणाले कि ज्या वेगाने मराठ्यांनी आपला साम्राज्य विस्तार केला ते पाहता जर भारतात इंग्रज आले नसते तर संपूर्ण भारतावर मराठ्यांनी राज्य केलं असतं आणि भारतातील धार्मिक सहिष्णुता अजूनच मजबूत झाली असती. ह्याबाबाबत बोलतांना थरूर पुढे म्हणाले कि मराठ्यांनी तंजावर पर्यंत आपला साम्राज्य विस्तार केला होता. आज आपण दक्षिण भारतीय सांबर नावाचा खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात आपल्या आहारात वापरतो त्याचे नाव संभाजी महाराज ह्यांच्या नावावरूनच सांबर असे ठेवण्यात आले.

Loading...

सुप्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचा हा व्हिडियो माझ्या नुकताच पाहण्यात आला. एका विद्यार्थिनीने त्यांना असा प्रश्न विचारला की 'ब्रिटिश भारतात आलेच नसते तर काय झालं असतं ?'त्यावर थरूर यांनी उत्तर दिलंय की, "ब्रिटिश भारतात आले नसते तर आज भारतावर मराठा साम्राज्याचे राज्य असले असते, आणि मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या लोकशाही आणि सर्वधर्म समभावाच्या विचाराने संविधानिक मार्गाने देशावर राज्य केलं असतं !"आपणही जरूर पहा !

Posted by Jayant Patil – जयंत पाटील on Friday, July 12, 2019

ह्यावेळी शशी थरूर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ह्यावेळी शशी थरूर म्हणाले कि युद्ध करतांना एखाद्या सैनिकाला मुस्लिमांसाठी पवित्र असलेला ग्रंथ कुराण जर सापडला तर त्याची विटंबना न करता तो एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे सुरक्षित सोपवला जावा असा आदेशच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिलेला होता.

त्यामुळे जर भारतात इंग्रजांनी आपली वसाहत स्थापन केली नसती तर भारतावर मराठ्यांचे राज्य असले असते व भारतातील धार्मिक सहिष्णुता अजून मजबूत झाली असती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ह्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर थरूर ह्यांचा हा व्हिडीओ शेअर केला होता व त्यानंतर तो अधिक वेगाने व्हायरल झाला इंग्रजांच जरी राज्य असलं आणि जरी भारताला लुटलं असलं तरीही इंग्रजांनी भारताला खूप काही विकसनशील पासून विकसित होण्याच्या मार्गावर आणून सोडलं आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.