उपवास सोडताना तुम्ही ह्या चुका तर करत नाही ना..?

0

उपवास करणे म्हणजे पोटाला, जिभेला आणि मनाला शांत ठेवणे आणि प्रभूचे नामस्मरण करणे.. मात्र ह्या पेक्षा जास्ती, उपवासाला खायला काय काय चालते आणि काय काय नाही ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते. साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा किस, उपवासाची थालिपीठं, बटाट्याची भाजी, भगर, आमटी, उपवासाचे वडे – कचोरी, दही, श्रीखंड, लस्सी, बर्फी, पेढे आणि फळं. उपवासाचं ताट कसं भरलेलं.. पण आता हे सगळे खाऊन उपवास करणारऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

हे सगळे पदार्थ पोटाला आराम नाही तर क्लेशदायक आहेत हे सगळ्यांना माहीत होऊ लागले आहे. उपवासाला सुद्धा हेल्दी फूड खाण्याकडे कल वाढला आहेच.मात्र रात्री अथवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आपण काय करतो..?? चहा घेतो की एकदाच भरपूर जेवून घेतो..? अहो जसे हेल्दी उपास करता ना तसेच उपास हेल्दी पद्धतीने सोडले गेले पाहिजेत. अशा काही चुका तुम्ही ही करता का उपवास सोडताना..? आज तपासून पहा.

१. एकाच वेळी ताटभर जेवून उपवास सोडणे: आपला काही तसंच उपवास झालेला असताना अचानक खूप अन्नपदार्थ खाऊन उपवास सोडणे म्हणजे पोटाला त्रास देणे आहे. आपलेच पाच बिघडून पोटदुखी, उलट्या, ऍसिडिटी ह्याला आपण निमंत्रण देतो. त्या पेक्षा काही हलकेसे पदार्थ खाऊन उपवास सोडावा.

२. उपवास सोडताना जळजळीत पदार्थ खाणे: उपशी पोटी जळजळीत तिखट पदार्थ अत्यंत घातक आहेत. त्यापेक्षा कोमट पाणी पिऊन उपवास सोडायला बसावे. पोटात आग पडत नाही. आणि पुढे जे खाऊ ते पचायला सोप्पे. हवे तर लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा फळांचा ज्यूस देखील घेतला जाऊ शकतो.

३. उपवास सोडायला अति उष्मांक म्हणजेच फॅट असलेले पदार्थ खाणे: जास्ती फॅट असलेले पदार्थ खाऊन पचन संस्थेवर वजन ठेवण्यापेक्षा प्रोटीन युक्त, फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यास ते पोटाला उत्तम.

४. तळलेले किंवा गोड पदार्थ खाणे: सरळ तेलकट तुपकट किंवा अतिगोड पदार्थ खाऊन देखील उपवास सोडू नये. ह्याने खूप वेळ रिकाम्या असलेल्या पोटावर ताणच पडतो. त्या पेक्षा हलके पटकन पचणारे पदार्थ योग्य..!!

तर मंडळी काय खायचे नाही ते आपण पाहिले. पण काय खाऊ शकतो हे देखील तुम्हाला माहीत असले पाहिजे. उपवास सोडताना खाण्यासाठी खूप ऑप्शन उपलब्ध असतात. जसे की, मिक्स कडधान्याच्या पिठाचे पराठे, पोळ्या किंवा थालिपीठं आपण खाऊ शकतो. दुध्या, दोडके, भोपळा, टोमॅटो, भेंडी अशा कमी मसल्यातल्या भाज्या खाऊ शकतो.

भाज्या घातलेला उपमा दवखील पोटाला उत्तम.. पांढरा भात, खिचडी, वरण, आमटी, दही ह्याचे सेवन करू शकतो. फळांचे ज्यूस किंवा फ्रुट चाट देखील योग्य पर्याय आहे. उपास करणे जितके महत्वाचे तितकेच तो कटाक्षाने पोटाला त्रास होऊ न देता सोडणे हे देखील महत्वाचे.. म्हणून मंडळी आजच उपास सोडताना अशा पद्धतीने सोडून पहा.. म्हणजे पोटही खुश आणि तुम्ही ही खुश..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!