जर वाढलेलं वजन सहज कमी करायचं असेल तर काकडी खा,.. पण ह्या पद्धतीने खाल्लीत तर होईल फायदा.

0

उन्हाळा आला की बाजारात सुद्धा काकडी ची अवाक खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागते, म्हणजे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठीच निसर्गाचीच काही फळं, भाज्या, ह्यांची निर्मिती उन्हाळ्यात होईल अशी व्यवस्था केली आहे, त्यातली काकडी आहे.या शिवाय कलिंगड, टरबूज, कैऱ्या, ह्या आपल्याला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पहायला मिळतात. प्रत्येक ऋतूमध्ये येणारी फळे ही विशेष करून आपल्या शरीराला तंदरुस्त ठेवतात. फळ भाज्या , पाले भाज्या सुद्धा वेग वेगळ्या ऋतूत खाण्यासाठी निसर्ग निर्माण करत असतो. म्हणून वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळं ,भाज्या खाणं हे फायदेशीर ठरतं.

आता काकडी मध्ये पण काही विशिष्ट गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातली पाण्याची पातळी योग्य राखली जाते. उन्हाळ्यात शरीरातली पाण्याची पातळी उष्णतेमुळं कमी होऊ शकते. ती योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी असलेली फळं खाल्ली तर फायदाच होतो. शरीराचं अतिरिक्त वाढलेलं वजन सुद्धा काकडी खाऊन कमी करता येतं. फक्त ती कशी खायची याची योग्य पद्धत आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. मग बघूया की वजन कमी करायला काकडी कशी खायला पाहिजे.

१- टरबूज आणि काकडी स्मूदी रेसिपी : साल काढलेली अर्धी काकडी आणि साल काढून टरबूजाचे पाव कप बारीक तुकडे एकत्र करून त्यात काळी मिरी पावडर चवी साठी घालून त्यात काही थेंब लिंबाचा रस घालून मिक्सर मधून बारीक करून घेऊन, ही टेस्टी स्मूदी दुपारच्या जेवणानंतर प्यायल्यास शरीरातली उष्णता कमी होते आणि शरीरातली पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते, कारण काकडी आणि टरबूज ह्या दोन्ही मध्ये भरपूर पाण्याची मात्रा असते.

२- लिंबू -काकडी वॉटर रेसिपी : नुसता काकडीचा रस काढून पिणे म्हणजे एक बोअर काम, कित्येकांना ते आवडत नाही, पण ह्या काकडीच्या रसात जर थोडं लिंबू पिळून प्यायला खूप मजा येईल. आणि वजन कमी करायला हे रामबाण ठरेल. किंवा अर्ध्या काकडी चे बारीक बारीक तुकडे करून त्यात ग्लासभर पाणी घालून एक लिंबू पिळून फ्रीज मध्ये ठेवा आणि ते थंड झाल्यावर प्या.

३- पुदिना – काकडी वॉटर रेसिपी : एक साल काढलेली काकडी बारीक तुकडे करून त्यात पाव चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा मध आणि ८ ते १० पुदिन्याची पानं टाकून त्याची मिक्सरवर प्युरी करून घ्या. नंतर त्यात पाणी आणि काही थेंब लिंबू रस घालून चवी साठी थोडं मीठ घालून चांगलं मिक्स करून ते पाणी प्या. पुदिना हा अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे त्याचा फायदा होतो आणि एक चविष्ट पेय प्यायल्याचा ही आनंद मिळतो. काकडी वजन कमी करायचं काम करते.

४- द्राक्ष आणि काकडी स्वादिष्ट पेय : एक अतिशय स्वादिष्ट पेय आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय. अर्धी काकडी चे बारीक बारीक तुकडे करून ठेवा, नंतर एक कप द्राक्ष घेऊन त्यांचा ज्युस काढून त्यात ही काकडी एकत्र करा, त्यात शक्य असल्यास सोडा, किंवा नसल्यास थंड पाणी घालून काही थेंब लिंबू रस घाला , चांगले ढवळून थंड थंड प्या.

५- संत्र आणि काकडी स्मूदी रेसिपी : २ संत्री सोलून घ्या , त्याचा गर काढून तो एका सॉस पण मध्ये घेऊन त्यात अर्धी काकडीचे बारीक बारीक तुकडे मिक्स करून त्यात थोडा लिंबू रस मिसळून गरम करा, नंतर ते मिश्रण मॅश करून एकजीव करा , आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा आणि रोज सेवन करा. घरच्या घरी रेसिपी तयार.

अशा पद्धतीने काकडीचे वेगवेगळ्या स्वरूपात सेवन तुम्ही करू शकता. आनंद मिळेल , शरीरातली उष्णता कमी होईल आणि वजन कमी करायला मदत सुद्धा होईल. काकडी ही दुपारीच खावी. रात्री काकडी खाणे म्हणजे घातक ठरू शकते म्हणजे जाडी वाढू शकते. म्हणून काकडी रात्री खाऊ नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!