वॉट्सअप वर त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करायचंय तर मग करा उपाय !

0

मित्रांनो वाट्सएप वर आपल्याला नको असलेले मेसेजेस थांबवणं काही सोपं काम नाहीये , या साठी आज पर्यंत रिपोर्ट किंवा ब्लॉक options avaliable होते , पण आता या नको असलेल्या मेसेजेस ला थांबविण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) वाट्सएप यूज़र (WhatsApp User) साठी एक खास फीचर घेऊन आलं आहे या फिचर चा वापर करून तुम्ही आपत्तिजनक कंटेंट थांबवू शकता.

ज्या प्रमाणावर social networking वेबसाइट्स चा वापर वाढत आहेत त्याप्रमाणचे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती तथा असामाजिक तत्व वाट्सएप सारख्या माध्यमाचा वापर आक्षेपार्ह, अनधिकृत, अश्लील, जीवघेण्या धमक्या किंवा अन्य प्रकारचे चुकीचे मेसेज पाठवण्यासाठी करतात.

आता यावर बंदी करत असल्याचे डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) ने 19 फेब्रुवारीला जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. शिवाय, चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या ग्राहकांवर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

आता पर्यंत वाट्सएप (WhatsApp) वर आपत्तिजनक फोटोज़, कंटेंट और वीडियो पाठवनार्याना फक्त ब्लॉक केले जायचे परंतु आता .डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम नि एक्शन घेतली आहे . यासाठी तुम्हाला त्या मैसेजेस चा स्क्रीनशॉट मोबाइल नंबर सहित ccaddn-dot@nic.in या ई-मेल आईडी वर पाठवावा लागेल .

दूरसंचार विभागचे संचार नियंत्रक (Communication Controller) आशीष जोशी यांनीही ट्विटरद्वारे सांगितले की, एखाद्या व्यक्तीला व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील, आक्षेपार्ह, जीवघेणी धमकी देणारे मेसेज येत असतील, तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकासहीत आलेल्या मेजेसचा स्क्रीनशॉट घेऊन ccaddn-dot@nic.in. वर मेल करावा.

या नंतर संबंधित कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांना समोर ठेऊन आम्ही आवश्यक त्या कारवाई करण्याचे आश्वासन डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) ने दिल आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!