भारतात डाव्या दिशेने वाहने का चालवतात? जाणून घ्या काय आहे कारण
काही देशांत उजव्या बाजूने वाहने चालविली जातात तर काही देशांत डाव्या बाजूने. ह्याचे मूळ वसाहतींच्या काळात दडले आहे. भारतात आपण डाव्या बाजूने जी वाहने चालवतो ते ब्रिटिशांचे देणं आहे. किंबहुना त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे अजून पण डाव्या बाजूने वाहने चालविली जातात जसे की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इ. आणि ब्रिटिश पण अर्थातच स्वतः पण हा नियम अजून पाळतात.
डाव्या बाजूने वाहन चालविण्याचा नियम पाळणाऱ्यांमध्ये जपान हा एक असा देश आहे जिथे ब्रिटिशांची सत्ता नव्हती. सुरुवातीला जपानमध्ये जेव्हा रेल्वे सेवा सुरू करायची होती तेव्हा त्यांनी तंत्रज्ञानासाठी ब्रिटिशांची मदत घेतली आणि ब्रिटिशांनी त्यांच्या सवयीप्रमाणे डाव्या बाजूने वाहन चालविण्याची प्रणाली वापरली. जपानी तंत्रज्ञाना ती प्रणाली आवडली आणि त्यांनी वाहनांमध्ये पण त्याचा वापर सुरू केला.
डाव्या बाजूने वाहने चालविण्यामागील पार्श्वभूमी
आपण जर इतिहासामध्ये डोकावून बघितले तर डाव्या बाजूने वाहन चालविण्याचे मूळ आपल्याला मध्ययुगात आढळून येते. त्यावेळेला सैनिक हे घोड्यावरून प्रवास करायचे आणि त्यांना युद्धासाठी सतत तयार राहावे लागायचे. कधी तरी शांतपणे जात असताना पण अचानक छोटी लढाई होण्याचा धोका असायचा.
जास्त ते योद्धे हे उजव्या हाताचा वापर करणारे असल्यामुळे ते घोडा डाव्या बाजूने चालवणे जास्त योग्य समजायचे. ह्याचा फायदा हा असायचा की अचानक हत्यार काढून वार करायचा झाला तर ते सोपे व्हायचे. तसेच बाजूने जाणाऱ्या सरदारांशी किंवा इतर लोकांशी हस्तांदोलन किंवा त्यांचे स्वागत करणे सोपे व्हायचे.
पण फ्रेंच राज्यक्रांती घडली आणि लोकांनी सगळेच नियम (चांगले किंवा वाईट) बदलायचे ठरविले. त्याना राजांच्या काळापासून चालत आलेला हा नियम पण बदलला आणि उजव्या बाजूने चालण्याचा किंवा घोडे हाकण्याचा नियम सुरू केला. तसेच नेपोलियन हा पण स्वतः डावखुरा होता त्यामुळें पण त्याच्या काळामध्ये उजव्या बाजूने रस्त्यावर चालण्याचा, घोडे चालविण्याचा नियम रूढ झाला.
अमेरिकेमध्ये वाहने उजव्या बाजूने का चालवतात?
उजव्या बाजूने वाहने चालविण्याचा नियम सुरू होण्यामध्ये अमेरिकेचा पण वाटा आहे. तिथे जेव्हा चार घोड्यांनी हाकली जाणारी घोडागाडी चालविली जायची तेव्हा चालक हा डाव्या बाजूने बसायचा. त्याचे महत्वाचे कारण हे होते की मध्ये मध्ये त्याला चाबूक वापरावा लागायचा. चाबूक उगारताना तो हवेमध्ये फिरवावा लागायचा.
घोडेगाडी डाव्या बाजूने न चालवता उजव्या बाजूने चालविल्यामुळे समोरून येणाऱ्या लोकांना किंवा दुसऱ्या गाड्यांवर बसलेल्या लोकांना चाबूक लागून भांडण व्हायचा धोका कमी व्हायचा आणि हाच नियम पुढे इतर वाहनांसाठी वापरला गेला आणि अजूनपर्यंत तसाच सुरू राहिला. जगामध्ये जवळपास ६५% देशांमध्ये वाहने उजव्या बाजूने चालविली जातात.
Source: Why Does India Drive On The Left Side Of The Road?
Credit: महेंद्र राऊत