पहा हा भडवा पाकिस्तानी इम्रान खान काय बरळतोय!

0

१४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमध्ये एक हल्ला झाला ज्यात भारताच्या सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली असून ; हुतात्म्यांच्या प्राणांचा बदला म्हणून ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे पण तरीही या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे ही गोष्ट आपल्याला कुठतरी टोचत आहे. या गोष्टींना आळा घालण्यासाठी भारतीयांनी अनेक पाऊल उचलले आहेत आणि आता पाकिस्तान सुद्धा “युद्ध सारख्या” गोष्टींना होकार दाखवत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी म्हटलं कि “जर भारताची युद्ध करायची इच्छा असेल तर आम्ही सुद्धा चूप बसणार नाही, चोख उत्तर दिल्या जाईल”. इम्रान खान यांनी मंगळवारी आकाशवाणीवरून पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, हा नवा पाकिस्तान आहे. आम्हाला देशात स्थैर्य हवे आहे.

त्यांनी असंही म्हटलं की भारत आमच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असेल आणि आम्ही प्रतिकार करणार नाही, असे कोणाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चूक आहे. आम्ही भारताच्या हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ. युद्ध सुरू करणे हे आपल्या हातात असते. मात्र, हे युद्ध आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हे देवालाच माहिती आहे. त्यामुळे ही समस्या चर्चेनेच सोडवली पाहिजे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप करत आहे. पाकिस्तानातील कोणीही हिंसा न करणे, हेच आमच्या देशासाठी हिताचे आहे. यानंतरही भारताने पाकिस्तानमधील कोणाविरुद्ध पुरावे दिले तर आम्ही त्यांच्यावर जरूर कारवाई करू, असे आश्वासन यावेळी इम्रान खान यांनी दिले.

मंगळवारी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त पत्रकार परिषद घेत पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानची आर्मी आणि आयएसआयचा हात असल्याचं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!