Loading...

तब्बल १५ वर्षानंतर पुन्हा येतोय लहान थोरांचा सगळ्यांचा आवडता ‘सुपर हीरो’ नव्या रूपात !

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

१३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५, सतत आठ वर्षे भारतात लहान थोरांचा मनावर अधिराज्य गाजवणारा पूर्णपणे भारतीय असलेला सुपर हीरो आठवतो का? “शक्तिमान” त्याचं नाव. बाकीचे सुपर हीरो भारताबाहेरून आले होते. बॅटमॅन, स्पायडरमॅन, सुपरमॅन, हे सगळे बाहेरच्या देशातून आले होते पण “शक्तिमान ” केवळ भारतीय असल्यामुळे त्याच्याशी आपल्या सगळ्या घरातल्या छोट्या कंपनीची जरा जास्तच जवळीक होती नाही का?

Loading...

घरा घरात मुलांना सतत शक्तिमान ची ओढ लागायची, आजचा एपिसोड झाला की उद्या कधी येतोय, काय नवीन गोष्ट आपल्याला कळणार ह्याची सगळेच खूप आतूर होऊन वाट बघायचे. काही मुलांना तर शक्तिमान आपल्या घरातलाच मेम्बर वाटायला लागला होता, काही मनातल्या अशक्य गोष्टी सुद्धा शक्तिमान पूर्ण करेल अशी खात्री मुलांना वाटायची.

अशी जवळीक आणि घरोबा इतर देशातून आलेल्या, सुपरमॅन, बॅटमॅन किंवा स्पायडरमॅन बद्दल वाटला नसेल मुलांना. म्हणून आज सुद्धा त्या शक्तीमान ची क्रेझ टिकून आहे. आता पुन्हा तोच “शक्तिमान” पुन्हा सगळ्या घराघरात भेट देणार आहे, फक्त वेळ लक्षात ठेवून टी व्ही लावायचा.

“सॉरी शक्तिमान” ह्या नवीन घोषणेचा नाद आता सगळ्या बालगोपालांमध्ये घुमणार आहे. “सॉरी शक्तिमान” आता मुलांना काही प्रबोधन सुद्धा करणार आहे त्यामुळे मुलांना रोजच्या जीवनातल्या काही माहीत नसलेल्या गोष्टींचं ज्ञान होणार आहे, आणि त्याच बरोबर करमणूक आणि साहस ह्या गोष्टीही सोबत मिळणार आहेत. अशा वेगळ्या ढंगात शक्तिमान पुन्हा सगळ्यांना भेट द्यायला येणार आहे.

नवीन नवीन माहिती मुलांना ह्या नवीन कार्यक्रमातून मिळणार आहे, काही चुका मुलांच्या हातून झाल्या तर त्या कशा सुधारायच्या ह्याच्या आयडिया सुद्धा मुलांना मिळतील. ह्या नवीन “सॉरी शक्तिमान” मध्ये पंडित गंगाधर शास्त्री सुद्धा असणार. पूर्वीच्या ‘शक्तिमान’ मधले गंगाधर, गीता विश्वास, तमराज किल्विष, डॉ. जयकाल, महागुरू, आणि डॉ. विश्वास ह्यांना अजूनही कोणी विसरलं नाही.

Loading...

इतका ह्या सगळ्या पात्रांचा पगडा मुलांच्या मनावर बसलेला होता. शाळा सुरू झाल्या की बऱ्याच स्कूल बॅग्स वर शक्तिमान असायचा, कंपॉस बॉक्स, लंच बॉक्स वर “शक्तिमान” चा फोटो छापलेला असायचा, त्या स्कूल बॅग्स, वॉटरबॅग्स, कंपॉस बॉक्स चा खप प्रचंड प्रमाणात व्हायचा. हीच शक्तीमान च्या लोकप्रियतेची पावती होती. मुलांना चैन पडत नव्हती, शक्तिमान चा रोजचा भाग बघितल्या शिवाय.

त्यावेळी जी बाल गोपालांची पिढी शक्तिमान पहायची ती आता १५ वर्षांनी मोठी झाली आहे. त्यांची आवड निवड बदलली असली तरी “शक्तिमान” ची क्रेझ ही वेगळीच होती. आणि ती आताही तेवढीच जादू ह्या तरुणांवर करेल .कारण “शक्तिमान” चा रोल ‘मुकेश खन्ना’ च करणार असल्यामुळे तीच क्रेझ असेल, आणि आता कदाचित जास्त परिपक्व आणि ज्ञान देणारी ही सिरीयल असणार आहे.

त्यामुळे तितक्याच ओढीने ती पहिली जाईल अशी आशा निश्चितच आहे. थोडी आणखी काही दिवस आपल्याला ह्या नवीन “सॉरी शक्तिमान” ची वाट पहायची आहे. कारण त्याचं काम अजून चालू आहे. मग देऊयात आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा ह्या नवीन “सॉरी शक्तिमान” च्या नव्या ढंगातल्या ह्या सिरीयल साठी.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.