या आहेत भारतातल्या ७ मुर्त्या ज्यांच्याविषयी जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित !

0

भारतीय संस्कृती ही अध्यात्म आणि देव देवतांची महती सांगणारी संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतामध्ये भव्य मंदिरं, भव्य मूर्ती, भव्य कलाकृती, पुरातन काळापासून जपल्या आहेत. म्हणून प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या दगडांवर मूर्ती कोरून , सुंदर नक्षीकाम करून उभारलेली मंदिरं, लेण्या, पुतळे, सगळीकडेच पाहायला मिळतात. ह्या मूर्ती , कलाकृती, तयार करण्यासाठी पूर्वी काहीही सुविधा नसताना सुद्धा इतक्या रेखीव बनवल्या गेल्यात त्यामुळे आधुनिक काळात त्याचे खूप अप्रूप वाटते.

पूर्वी देव देवतांच्या मूर्ती श्रद्धा म्हणून बनवल्या गेल्या, त्याची आजही आधुनिक काळात तितक्याच श्रद्धेने लोक पूजा करतात हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा पैलू म्हणता येईल. त्यानंतर, साधू संत, असामान्य पराक्रमी राजे, देशासाठी प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्य वीर, देशाला प्रगतीकडे नेणारे देशाचे नेते, ह्यांचे पुतळे उभे केले जाऊ लागले, श्रद्धा, प्रेरणा हेच त्यामागचं मोठं कारण आहे. अशा अनेक भव्य मूर्ती श्रद्धा, आणि प्रेरणा म्हणून आपल्या भारत देशात उभ्या केल्या गेल्या, त्यातल्या ह्या ७ आहेत अति भव्य मूर्ती, ज्यांची भव्यता डोळ्यात न मावणारी आहे.

७ – मुरुडेश्वर: भगवान शंकराचे एक नाव आणि ह्या नावावरूनच ह्या गावाचेही नाव मुरुडेश्वर पडलं. कर्नाटकातल्या, उत्तर कन्नडा जिल्ह्यातल्या मुरुडेश्वर ह्या गावातलं हे भव्य मंदिर आहे , आणि इथल्या भगवान शंकराच्या प्रचंड मूर्तीची उंची १२२ फूट आहे. म्हणून ह्या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

६ – पद्मसंभव : पद्मसंभव बौद्ध धर्माचे ऋषी गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. पद्मसंभव चा शब्दशः अर्थ ‘कमळातून जन्मलेला’ असा होतो. हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यातल्या, रेवालसर धबधब्याजवळ ही पद्मसंभव मूर्ती उभारली आहे. ह्या मूर्तीची उंची १२३फूट आहे.

५ – ध्यान बुद्ध प्रतिमा: आंध्र प्रदेशातल्या अमरावती शहरा जवळच्या कृष्णा नदीच्या तीरावर उभारली आहे ही भव्य बुद्ध मूर्ती. प्रेम आणि शांती मिळवून देणारी ही भव्य प्रतिमा एकदा तरी पाहून अनुभव घेऊन यावी अशीच आहे.

४ – तथागत तल : दक्षिण सिक्कीममधल्या रावणला इथल्या बुद्धपार्क मध्ये ही भगवान बुद्धाची सर्वात उंच मूर्ती आहे. ही मूर्ती बनवायला २००६ मध्ये सुरुवात झाली आणि २०१३ मध्ये ही मूर्ती पूर्ण तयार झाली. इतकी वर्षे ही मूर्ती बनवायला लागली कारण ह्या मूर्तीची उंची ३९ मीटर आहे म्हणून.

३ – तिरुवल्लूवर : तिरुवल्लूवरची ही उभी मूर्ती बंगालच्या खाडीमध्ये कन्याकुमारी शहराच्या एक द्वीपवर उभारली आहे. विशेष म्हणजे हिंदी महासागर आणि अरबी समुद्र ह्यांच्या संगमावर हा द्वीप आहे आणि ह्या द्वीपवर ही मूर्ती स्थापन केली आहे. ९५ फूट उंच ही मूर्ती आहे.

२ – “वीरा अभय अंजनेंय हनुमान स्वामी”: म्हणजेच साक्षात श्रीरामाचा परम भक्त श्री हनुमान, अंजनी सुताची , पवन पुत्राची, ही भव्य मूर्ती आंध्र प्रदेश राज्यातल्या , विजयवाडा शहराच्या जवळच्या परिताला ह्या शहरामध्ये स्थापन केली आहे. २२जून २००३ ह्या दिवशी ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

१ – सरदार वल्लभ भाई पटेल: लोह पुरुष, भारतीय स्वातंत्र्याचा महा मेरू . कणखर व्यक्तीमत्व, आणि संपूर्ण भारताला एकत्र आणणारा महापुरुष म्हणजे वल्लभ भाई पटेल. भारताचा प्रेरणा स्रोत म्हणून वल्लभ भाई पटेलांचा भव्य पुतळा गुजरात मध्ये नर्मदा नदीच्या पात्रात उभा केला गेला आहे. ह्या पुतळ्याची उंची १८२ फूट इतकी भव्य आहे.

ह्या मूर्तीच्या आतून लिफ्ट ने वरती जाऊन ह्या मूर्तीची भव्यता अनुभवता येते. ह्या भव्य पुतळ्याला ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ म्हणून संबोधलं जातं आहे. आयुष्यात एकदा तरी ह्या ७ मूर्ती पाहून याव्यात अशा सुंदर आणि भव्य आहेत. ह्या मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांना आणि त्यांच्या कलेला सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!