थोड्याश्या अपयशामुळे किंवा चिंतेमुळे जीवाचे बरेवाईट करताय तर वाचा मीराची हृदयद्रावक कथा !

0

माणसाचा जीव सध्या फारच स्वस्त झालाय.. नैसर्गिक मृत्यू पेक्षा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामधले मृत्यू चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. बाकी दहशदवादी हल्ला, सुडाने पेटलेल्या व्यक्तीचा हल्ला ह्यातही कोणी ना कोणी जीव गमावते. काहीच नाही तर स्वतःच्या आयुष्याला कंटाळून स्वतःचा जीव जीव घेणारेही कमी नाहीत. मृत्यू वर आपला ताबा नाही मात्र नैराश्यवादी लोकांनी स्वतःला नक्कीच सावरले पाहीजे.

आयुष्य खूप सुंदर आहे. थोडी हिम्मत ठेवलीत तर तुम्ही जगाला नाही, तर निदान तुमच्या स्वप्नांना तरी गवसणी घालू शकता. अशीच एक हिम्मतवान मुलगी आहे जमीम मीरा.. जिने स्वतःवर झालेल्या मोठ्या आघाताला खंबीर रित्या तोंड दिलंय.. काय आहे तिची इंस्पायरिंग स्टोरी..??

खरे तर मोठमोठ्या माणसांना आपल्या माणसांच्या जाण्याचे दुःख अनावर होते. कित्येक दिवस ते दुःखाच्या गर्तेतून बाहेरच येऊ शकत नाहीत. साहजिकच आहे. आपले माणूस कोणत्या कारणाने मरण पावले तर लगेच आपण कसे पूर्ववत होऊ शकतो..?? पण जमीम ने मात्र जगावेगळी हिम्मत दाखवली आहे.

तामिळनाडूच्या पलाईमकोट्टीला राहत असलेल्या जमीमने आपल्या आईवडिलांना शेवटचा निरोप देत, १२ ची परीक्षाही देत आहे. २७ फेब्रुवारी २०१९ ला जमीम मीरा आपल्या आई वडिलांसोबत (स्व. इस्माईल आणि मैदिन) NEET च्या परीक्षेचे कोचिंग पूर्ण करून उडुमालपेट वरून घरी येत असता रात्री १ च्या सुमारास गंगाईकोंडन गावात त्यांच्या कार वरचा ताबा सुटला.

जमीम, तिचे आईवडील आणि काही नातेवाईक असलेली ही कार एक ट्रकला जाऊन धडकली आणि जोरदार अपघात झाला. तत्क्षणी तिच्या आईवडिलांचे देहावसान झाले. जमीम आणि तिचे नातेवाईक खूप जखमी झाले मात्र सुदैवाने त्यांचा जीव बचावला. आता आई वडील स्वतःच्या डोळ्यांसमोर गेल्यावर काय दुःख होत असेल ते आपण समजू ही शकत नाही. तरीही जमीम चे मनोबल तुटले नाही. इतकेच नाही तर १ मार्च पासून सुरू झालेल्या तामिळनाडू बोर्डच्या बारावीच्या परीक्षेलाही ती बसली आहे.

मनाची अपार शक्ती दाखवणारी जमीम पहिल्या पेपरला डोक्यावर, जखमांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत नातेवाईकांच्या मदतीने परीक्षा हॉल मध्ये दाखल झाली. ज्यावेळी ती परीक्षेचा पेपर लिहीत होती त्यावेळी तिच्या आई वडिलांच्या पार्थिवावर, स्मशानभूमीत अंतिम संस्कार चालू होते. त्याच आई – वडिलांची इच्छा होती की की जमीमने डॉक्टर व्हावे. पण ते पूर्ण व्हायच्या आधीच ईश्वराने त्यांना बोलावून घेतले. असा प्रसंग ज्यावेळी भले भले गलितगात्र होतात अशा वेळी मात्र ह्या १७ वर्षांच्या जमीमने इतके धैर्य दाखवले.

आई वडिलांच्या इच्छेखातर तिने परीक्षा चुकवली नाही. त्यांची ही शेवटची इच्छा मानून तिने त्यांचे स्वप्न खरे करायचे ठरवले आणि परीक्षेस बसायचा निर्णय घेतला. नातेवाईक सांगतात तिच्यात हे बळ कुठून आले ते माहीत नाही मात्र तिच्या ह्या हिमतीने कौतुक करावे तितके थोडे आहे. जे नैराश्यापोटी आपलेच जीवन संपवतात त्यांच्या साठी जमीम एक उदाहरण आहे.

कितीही मोठे संकट आले तरी स्वतःची जीवनयात्रा संपावण्यापेक्षा नवीन स्वप्ने बघून ती पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करावी असा संदेशच जणू जमीमने त्यांना दिला आहे. आई वडील देवाघरी गेलेले असतानाही दोनच दिवसात, जीवन जगण्याची नवी आशा आणि दिशा घेऊन उभ्या राहिलेल्या जमीमच्या ह्या असामान्य धैर्याला सलाम..!!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!