Loading...

जगन्नाथ मंदिर – न उलगडलेल कोडं

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

ओडिशातील जगन्नाथ मंदिर. सदैव वाऱ्याच्या विरुद्ध फडकणारा कळसावरील ध्वज ते मंदिराच्या वरून उडण्यास न धजावणारे पक्षी अशी अनेक रहस्ये ह्या मंदिराशी निगडित आहेत.  हिंदू धर्मातील पवित्र अश्या चार धामांपैकी एक असणारे ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे तेथे संपन्न होणाऱ्या वार्षिक रथयात्रेसाठी खूपच प्रसिद्ध आहे. श्री देव विष्णूनी राजा इंद्रद्युम्नाच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यांनतर त्याने हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. ह्या मंदिराबद्दल काही विस्मयकारक गोष्टी जाणून घेऊया.

Loading...

कोणती तरी अज्ञात शक्ती पक्ष्यांना येथून उडण्यास मज्जाव करत असावी कारण ह्या मंदिराच्या आवारात पक्षी कधीच उडताना दिसून येत नाहीत.

मंदिरावर लावण्यात आलेला झेंडा हा कायम विज्ञानाच्या नियमांच्या विपरीत हवेच्या विरुद्ध दिशेने उडत असतो. तसेच मंदिराच्या कळसावर एक २० फूट परिघाचे चक्र बसविण्यात आले आहे. मंदिराच्या कुठल्याही बाजूने ह्या चक्राकडे बघितले असता ते आपल्याच दिशेने तोंड करून बसविण्यात आले आहे असा भास होतो.

हे मंदिर अश्या प्रकारे बनविण्यात आले आहे कि दिवसाच्या कुठल्याही वेळेला मंदिराची सावली पडताना दिसून येत नाही. ह्याला अद्भुत स्थापत्यकलेचा नमुना बोलावे कि काही दैवी लीला हे एक कोडे आहे.

मंदिराला चार दरवाजे आहेत. त्यातील सिंहदरवाजा हा प्रमुख दरवाजा आहे. मंदिरामध्ये जसा तुम्ही प्रवेश करता तसा बाजूलाच असणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येणे अचानक बंद होतो. जो पर्यंत तुम्ही मंदिरामध्ये असता तोपर्यंत तुम्हाला समुद्राचा आवाज अजिबात ऐकू येत नाही.

सामान्यतः दिवसाच्या वेळेला समुद्राकडून जमिनीवर वारे वाहतात. पण जगन्नाथ मंदिराला लागून असलेला समुद्र ह्याला अपवाद आहे. येथे सकाळच्या वेळेला जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहतात.

प्रत्येक दिवशी मंदिराचा पुजारी हा २०० फूट उंच असणाऱ्या ह्या मंदिराच्या कळसावर चढतो आणि मंदिराचा झेंडा बदलतो. हि प्रथा मागील शेकडो वर्षे अविरतपणे सुरु आहे. ह्यामध्ये व्यत्यय आल्यास मंदिर पुढे १८ वर्षे बंद ठेवावे लागेल असे मानले जाते.

Loading...

मंदिरामध्ये बनविण्यात येणारा प्रसाद हा खास पद्धतीची मातीची भांडी एकमेकांवर मांडून बनविला जातो. आश्चर्याची गोष्ट हि आहे कि वरच्या भांड्यातील प्रसाद हा पहिला शिजतो. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या हि कायम बदलत असते. कधी हजार माणसे भेट देतात तर कधी कधी २० हजार माणसे पण भेट देतात. पण मंदिरामध्ये बनविण्यात येणार प्रसाद हा कधीच वाया जात नाही किंवा कधीच कमी पडत नाही. Viral Kekda

जगन्नाथ मंदिराबाबत अनेक रहस्यमय गोष्टी सांगता येतील. त्यापैकी काही गोष्टी ह्या स्थापत्यकलेशी निगडित आहेत तर काही विज्ञानाशी. पण काही अश्या गोष्टी आहेत ज्यांची उकल करणे निश्चितच शक्य नाही.

लेखक: महेंद्र राऊत

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.