Loading...

‘कभी खुशी कभी गम’ बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी!

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

‘चंदू के चाचाने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई’ हे टंग ट्वीस्टर म्हंटल्यावर हमखास आठवणारा चित्रपट म्हणजे कभी खुशी कभी गम. जर तुम्ही बॉलीवूडचे चाहते आहात तर तुम्हाला कभी खुशी कभी गम आवडत नाही, असं शक्यच नाही. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरची चित्रपटांमध्ये नेहमीच ड्रामा, भावना आणि प्रेमाच एकदम परफेक्ट मिश्रण असतं आणि कभी खुशी कभी गम हे याचं उत्तम उदाहरण आहे.

Loading...

या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे बघण्यासारखं आहे. ‘कुछ कुछ होता है’ ने करण जोहरला नाव दिलं आणि K3G ने त्याच्या कामावर शिक्कामोर्तब केलं, असं म्हणायला हरकत नाही. पण या चित्रपटाच्याबाबतीतल्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसतील.

प्रत्येक प्रसिद्ध चित्रपटाशी निगडीत अनेक मजेदार गोष्टी म्हणजे ट्रीव्हीया (trivia) असतातच. मग याला कभी खुशी कभी गम तरी अपवाद कसा असेल.  कभी खुशी कभी गमला 17 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशाच काही मनोरंजक गोष्टी.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आलेला हा चित्रपट आहे. कभी खुशी कभी गम आधी 1981 साली प्रदर्शित झालेला यशराजचा अजरामर ‘सिलसिला’ हा या दोघांचा एकत्र आलेला सिनेमा होता. या चित्रपटातील यश रायचंदच्या भूमिकेसाठी करण जोहरला अभिनेता अमिताभ बच्चनच हवे होते.

त्यांच्याशिवाय कोणालाही या भूमिकेत तो बघू शकत नव्हता. त्याने एवढं ही ठरवलेलं की, बिग बी नी हा प्रस्ताव नाकारला तर हा चित्रपट बनवणार नाही. यशवर्धन रायचंद या भूमिकेमागील करणची प्रेरणा होते ते त्याचे दिवंगत वडील निर्माते यश जोहर.

कभी खुशी कभी गम शूटींगदरम्यान करण झाला होता बेशुद्ध

‘बोले चूडिया’ हे या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं. या गाणाच्या शूटींगदरम्यान करण जोहरवर इतका तणाव होता की, डीहायड्रेशनमुळे तो बेशुद्ध पडला.

कभी खुशी कभी गम मधील एंट्रीज आणि एक्झिट्स

कभी खुशी कभी गम चित्रपटात अभिषेक बच्चनचाही कॅमिओ रोल होता. पण या रोलला एडिटींगच्या वेळी करणने कात्री लावली. पण युट्यूबवर मात्र हा सीन पाहता येईल. तर दुसरीकडे ऋतिक रोशनला हा चित्रपट अगदी सहज मिळाला. त्यावेळी ऋतिकचा कहो ना प्यार है हा चित्रपट आला ही नव्हता. करणने फक्त कहो ना प्यार है चा रफ कट बघितला आणि त्याला साईन केलं.

एवढंच नाहीतर बॉलीवूडमध्ये झळकण्याआधी जॉन अब्राहमला या चित्रपटातील रॉबीची भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, ज्याला जॉनने नकार दिला. हे होतं अभिनेत्याबद्दल तर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रेहमान या अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका करणार होत्या, पण अचानक त्यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे त्यांना हा चित्रपट सोडावा लागला.

Loading...

कभी खुशी कभी गम आधारीत पुस्तक आणि सीरियल

कभी खुशी कभी गम हा भारतातील पहिला चित्रपट आहे, ज्यावर पुस्तक लिहण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर टेली क्वीन आणि करण जोहरची चांगली मैत्रीण एकता कपूरने तर या चित्रपटावर आधारित सीरीयल करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.

Credit: Aaditi Datar – popxo

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=dsaWqwI7cGk[/embedyt]

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.