ज्या मंदिरात ‘ओल्ड मॉन्क’ चा नैवेद्य दाखवतात, ते कोणाचे आहे हे कळल्यावर तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल..!!

0

मंदिर, गर्भगृह, मुर्ती, पूजा, पुजारी, भक्त आणि नैवेद्य ह्याचं समीकरण कसं आपल्या डोक्यात फिट्ट बसलेलं असतं. मंदिर कोणतेही असो ह्या समिकरणामध्ये कोणताही बदल होत नसतो. पण एक अजब मंदिर जिथे गर्भगृहच नाही, म्हणून मूर्तीही नाही आणि भक्तच पुजारी बनतात.. असे हे मंदिर आहे केरळच्या एका छोट्या गावात. अहो इथे नैवेद्य सुद्धा जगावेगळा असतो. ओल्ड मॉन्क च्या बाटल्याच बाटल्या इथे भाविक घेऊन येतात आणि ह्या मंदिरात त्याचा भोग चढवला जातो.

असे कोणत्या देवाला चालत असेल बरे..?? तर हे कोणा देवाचे मंदिर नसून हे आहे महाभारतातील क्रूरकर्मा, ज्याच्या सत्तेच्या लालसेमुळे महाभारत घडलं त्या दुर्योधनाचे..!! अहो आश्चर्यम..!! वाचूनच हदरलात ना..? पण खरोखरीच केरळच्या कोलम गावात एड्क्कड भागात हे ‘पोरुवझी पेरुवथी मलनाड दुर्योधन मंदिर’ स्थित आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक उत्सवात तर एक भक्ताने इथे १०१ ओल्ड मॉन्कच्या बाटल्या भोग चढवायला दिल्या.

असे म्हणतात की जेव्हा दुर्योधन ह्या गावात आला होता तेव्हा त्याला खूप तहान लागली होती. गावातील लोकांनी त्याला तिथेच बनवलेली गावठी दारू पाजली तेव्हा त्याची तहान भागली आणि त्याला बरे वाटले. तेव्हा पासून त्याच्या जाण्यानंतर इथे मंदिर बांधले गेले आणि दारूचा नैवेद्य अजूनही दाखवला जातो. धुतराष्ट्र आणि गांधारी पुत्र दुर्योधनाच्या नावे हे पूर्ण भारतात एकमेव मंदिर आहे.

तिथले व्यवस्थापक सांगतात दारू, अमली पदार्थ ह्यांच्या सोबत इथे चिकन, बकरी, पण आणि सिल्क चे कपडे देखील अर्पण केले जातात. इथे बऱ्याच जाती धर्माचे भक्त आहेत. ह्या मंदिराचा वार्षिक उत्सवही जोशात साजरा होतो. आणि नैवेद्य म्हणून भरपूर दारूच्या बाटल्यांचा खच पडतो. इथल्या भक्तांची अशी श्रद्धा आहे की इथे प्रसाद चढवला की आयुष्यातल्या अडचणी दूर होतात. असा जगावेगळा भक्तिभाव बघून कोणालाही नक्कीच आश्चर्य वाटेल..

गंमत म्हणजे हे नेहमीच्या मंदिरांच्या रचनेसारखं नाहीच मुळी..!! ह्या मंदिराला गर्भगृह नाही, इथे दुर्योधनाची मूर्ती देखील नाही. फक्त एक मोठा चबुतरा आहे.. आणि तो २४ तास दर्शनासाठी खुला असतो. इथे विदेशी दारू सोबत देशी दारूचा भोग देखील चढवला जातो.. दुर्योधनाची मंदिर आणि ओल्ड मॉन्क चा नैवेद्य हे सगळं कसं विचित्र वाटतंय ना..?? तिकडे जाऊन बघितल्याशिवाय विश्वासही बसणार नाही.. दुर्योधनाचे मंदिर आणि त्याचे भक्त असू शकतात हेच मजेशीर आहे नाही का.. आता तर असेच म्हणावे लागेल, ‘हम लोगोंको समझ सको तो समझो दिलबर जानी…!!’

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!