हा मराठी तरुण शब्द विकून कमावतो महिन्याला लाखो रुपये. पहा काय आहे हि संकल्पना !

0

असं म्हणतात ना की एक भन्नाट कल्पना तुमचे आयुष्य बदलू शकते . ते अगदी खरे आहे .मराठी माणूस आणि बिझनेस हे समीकरण बरेच दिवस जुळत नव्हते. मराठी माणसाने एक तर शेती करावी किंवा गिरणी कामगार व्हावे एवढेच सर्वांना माहिती होते. पण आजचा काळ वेगळा आहे .आता मराठी माणसाने अनेक मोठ्या कंपन्या स्थापन करून या मानसिकतेला छेद दिला आहे .ही वर्ड बँक ही अशीच एक कंपनी आहे.

या कंपनीचा संस्थापक, अध्यक्ष किरण बेरड हा मराठी तरुण, महाराष्ट्रातील अहमदनगर सारख्या छोट्या शहरा नजीकच्या सोनेवाडी या जेमतेम शंभर उंबऱ्याच्या गावांमध्ये किरणचा जन्म झाला .कॉलेज संपल्यानंतर वर्तमानपत्र विकणे ,भाजीपाला विक्री व्यवसाय करत असताना लेखनाची त्याला आवड लागली .एका लोकप्रिय वर्तमानपत्रात वात्रटिका लिखाणापासून हा प्रवास सुरू झाला.

पुढे इपीतर सारखा विनोदी चित्रपट, रे राया सारख्या बिग बजेट सिनेमा चे लेखन त्याने केले आहे .सध्या महाराष्ट्रात एक नंबर वर असणारी सगळीकडे धुमाकूळ घालणारी गावरान मेवा ही वेबसेरीज ही त्यांनीच लिहिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शॉर्ट फिल्म असतील.जाहिराती असतील, डॉक्युमेंट्री फिल्म असतील ,मिळेल ते काम किरण करू लागला.

लेखन हे उत्पन्नाचे साधन बनले. एवढे करून हा येथे थांबला नाही ,त्यांनी संपूर्ण भारतातील लेखकांची एक टीम बनवली आहे. आज हे लेखक कस्टमरच्या गरजेनुसार त्यांना लिहून देतात. कुणालाही लेखनातील जे काही हवं असेल ते या वर्ड बँक या कंपनीकडून लिहून मिळते. उदाहरणार्थ भाषण, चित्रपटाची, लघुपटाची स्क्रिप्ट ,जाहिरातींच्या स्लोगन ,वेबसाईट कंटेंट रायटिंग, नाटक ,एकांकिका, सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट, रेडिओ जॉकीची स्क्रिप्ट, चरित्रग्रंथ ,टीव्ही ऍड या कंपनी कडून लिहून मिळतात.

7020380335 या  नंबरवर कॉल करून अथवा www.wordbank.co.in या वेबसाईटवर जाऊन आपण मागणी नोंदवू शकता. लेखकांना ही वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करता येते.मित्रानो ,आपणा सर्वांना मराठीचा अभिमान आहेत तेव्हा आपल्या माणसाचं कौतुक करण्यासाठी ही सक्सेस स्टोरी शेअर करुन जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. धन्यवाद..!

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
आमचा ईमेल : starmarathi1@gmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!