जयडीने दिले चाहत्यांना आनंदाची बातमी बातमीचे कारण जाणून तुम्हालाही आनंद होईल.

0

झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेतून जयडी या नावाने घराघरात पोहोचलेली किरण ढाले. आता लवकरच तुमच्या भेटीला पुन्हा नव्याने येणार आहे. “लागीर झालं जी” ही मालिका चालू असताना सॅलरीला घेऊन तिचे प्रोडक्शन सोबत वाद झाला होता म्हणून तिला ती मालिका अर्धवट सोडावी लागली. मालिकेत साकारलेली जयडी ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

अल्पावधीतच किरण डावेने नाही स्वतःचा एक स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला होता. तो आजही किरण ढालेला जयडी नावानेच ओळखतो. मालिका सोडल्यानंतर जयडीला अर्थात किरण ढालेला वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. परंतु त्यातल्या बहुतेक भूमिका जयडी सारखेच खलनायीकांच्या भूमिका असल्यामुळे किरणने नकार दिला.

आणि बरेच दिवस नव्या तसेच आव्हानात्मक भूमिकेची वाट पाहत होती. लवकरच त्या पद्धतीच्या भूमिकेचे ऑफर तिच्यापर्यंत धावून आले आणि आता ती एका नव्या मालिकेमध्ये नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे नाव अवनी असे असून, ही मालिका सोनी मराठी या चॅनेलवर लवकरच प्रसारित होणार आहे.

या मालिकेचे नाव “एक होती राजकन्या” असे आहे. या मालिकेत आगळेवेगळे म्हणजेच ती एका पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारताना तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. एका शिस्तप्रिय,रूबाबदार आणि देशप्रेमी पद्धतीची तिची मुख्यतः नायिकेची भूमिका असणार आहे. यासंदर्भात ची बातमी तिने एका व्हिडिओ मधून सर्वांनाच दिली आहे.

तिच्या चाहत्यांना नक्कीच ही बातमी आवडली असेल. किरण ढालेसाठी हे आव्हानात्मक भूमिका असणार आहे, जयडी प्रमाणेच या मालिकेतील पोलीस कॉन्स्टेबलची भूमिकाही तुम्हाला नक्कीच आवडेल. जयडीला आणि नव्या मालिकेतील अवनीला अर्थात किरण ढालेला तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!