Loading...

बिग बॉस मराठी सिझन २ – “रुपाली आणि वीणाच मला समजून घेत नाही” – किशोरी शहाणे

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चर्चेत असलेला KVR ग्रुपमध्ये कुठेतरी फुट पडत आहे असे काही दिवसांपासून भासते आहे… कालच्या विकेंड डावमध्ये देखील किशोरी शहाणे यांनी त्यांचे मत व्यक्त केले. आणि मला एकट पाडलं जात आहे असे त्यांनी सांगितले. रुपाली आणि वीणाने त्यांना किशोरीताई बद्दल न पटणाऱ्या गोष्टी “एकच फाईट वातावरण टाईट या टास्कमध्ये व्यक्त केल्या.

आणि हीच गोष्ट त्यांना खटकली त्यांना वाईट वाटले. किशोरीताईनी वीणा आणि शिव यांच्या मैत्रीबद्दल केलेले वक्तव्य या दोघींना अजिबात पटले नाही… किशोरी शहाणे यांनी वीणाला विचारले तुमचा दोघांचा टाईम पास कुठवर आला आहे ? यावर वीणा खूप दुखावली गेली. रुपालीने देखील तिला न पटणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या खूप दिवसांपासून मनामध्ये साचल्या होत्या. आता किशोरी शहाणे यांना घरामध्ये एकटे वाटू लागले आहे. आणि त्यांनी या गोष्टी घरातील कॅमेरासमोर सांगितल्या.

आज कॅमेरा समोर व्यक्त होताना त्या म्हणाल्या ज्याप्रकारे हे माझ्याशी वागत आहेत, इतका मोठा काहीच प्रोब्लेम झालेला नाहीये… मला समजून नाही घेत, माझ्याकडे दुर्लक्ष करतात, मला एकट पाडायचे असेल तर ठीक आहे मी तरी का मेहेनत घेऊ”. त्या पुढ्या म्हणाल्या जे माझ्याशी बोलत आहेत त्यांच्याशी बोलल तरी सगळ्यांना त्रास होतो आहे.

Loading...

मला वाटलं होत कि, रुपाली आणि वीणा तरी मला समजून घेतील असं मला वाटत होत, पण आता त्याच मला समजून घेत नाहीये, आता इतर लोक समजून घेतील असे वातावरण झाल आहे. ज्या सदस्याला मला पाठींबा द्यायचा आहे तो माझ्याशी बोलतच नसेल, तर नुसत टास्कसाठी एकत्र आहोत असे होते… एखाद्याला पाठींबा देण्यासाठी युनिटी पाहिजे, रिस्पेक्ट हवा आता तर दोन्ही नाहीये… मी वैयक्तिकरित्या कुणालाच नाही केलेलं नाहीये… जे काही गैरसमज होते त्यातून या घडामोडी झाल्या आहेत”.

आता बघूया वीणा आणि रुपाली किशोरीताईना समजून घेतील का ? पुन्हा एकत्र येतील का ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Loading...

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.