या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूडमध्ये नव्या नात्यांची सुरुवात व्हायला आणि जुनी नाती तुटायला वेळ लागत नाही. बऱ्याच सेलिब्रेटी कपल्सनी अनेक वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतल्याच्या घटना बॉलिवूडमध्ये नव्या नाहीत. त्यात आता आणखी एका नव्या जोडीची भर पडली आहे. या बॉलिवूड कपलनं तब्बल 10 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कोकणी सेन आणि रणवीर शौरी यांच्या घटस्फोटावर कोर्टाची मोहर लागली आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतर हे दोघंही वेगवेगळे राहत आहेत. 2015 मध्ये तितली सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी रणवीर त्याच्या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. कोंकणासोबत नातं तुटल्याचं आणि यासोबतच हे नातं तुटण्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे असं त्यानं यावेळी म्हटलं होतं.

स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार कोंकणा सेन आणि रणवीर शौरी यांनी आता अधिकृतरित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी सर्व कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्या असून 6 महिन्यांच्या मुदतीनंतर हे दोघंही अधिकृतरित्या वेगळे होतील. घटस्फोटाची याचिका दाखल करण्याआधी या दोघांनीही काउंसिलिंगच्या माध्यमातून या नात्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यातही त्यांचं एकमत होऊ शकलं नाही आणि अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

रणवीर शौरी आणि कोंकणा सेन यांना 6 वर्षांचा एक मुलगा सुद्धा आहे. दोघांनीही एकमेकांच्या सहमतीनं मुलासाठी जॉइन्ट कस्टडीची निवड केली आहे. त्यांच्यात दुरावा आलेला असतानाही हे दोघं मुलाची काळाजी मात्र घेत होते. कोंकणा आणि रणवीरनं 2010 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी ट्राफिक सिग्नल, मिक्स डबल्स यासारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. यावेळीच या दोघांमधील जवळीक वाढली. लग्नाच्या आधीच कोंकणा प्रेग्नन्ट होती. 2016 मध्ये हे दोघं ‘डेथ इन अ गंज’ या सिनेमात शेवटचे एकत्र दिसले.