Loading...

अभिनेत्री क्रांती रेडकर आहे ह्या ब्रॅण्डची मालकीण, नवरा आहे आयपीएस अधिकारी

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदा-या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडेमधील आणखी एक टॅलेंट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. आणि ते नेमके टॅलेंट कोणते याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही. उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन करुन प्रेक्षकांचे लक्ष पडद्यावर खिळवून ठेवणा-या क्रांतीने तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच करुन तिची आणखी एक नवी बाजू सर्वांना दाखवून दिली.

Loading...

नुकतेच, मुंबईमध्ये क्रांती रेडकरचा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ ZIYA ZYDA’ लाँच करण्यात आला. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा आपल्याला चिअर अप करण्यासाठी आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा आपल्यासोबत असतातच आणि त्याचप्रमाणे क्रांतीच्या खास जवळ असणा-या व्यक्ती आणि आपल्या सिनेसृष्टीतील कलाकारांच्या विशेष उपस्थितीत क्रांतीचा क्लोथिंग ब्रँड लाँच करण्यात आला आणि त्यांनी क्रांतीला शुभेच्छा देऊन तिच्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झालेली क्रांती अशा एका प्लॅटफॉर्मच्या शोधात होती जिथे तिच्या नवीन कल्पना, योजना समजून घेतल्या जातील आणि त्याच दरम्यान तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट टॅलेंट’शी झाली.

आणि जसा प्लॅटफॉर्म हवा होता तसाच प्लॅटफॉर्म क्रांतीला ‘प्लॅनेट टी’च्या माध्यमातून मिळाला आणि या माध्यमाच्या मदतीने तिने तिच्यातील टॅलेंट म्हणजेच ‘ZZ ZIYA ZYDA’ प्रेक्षकांसमोर आणले.

‘ZZ झिया झायदा’ या नवीन क्लोथिंग ब्रँडच्या नावातच आकर्षण तर आहेच आणि या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल आणि युनिक कलेक्शन पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील आहे.

क्रांती रेडकर हे नाव मराठी सिनेरसिकांसाठी काही नवीन नाव नाही. क्रांतीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. ‘जत्रा’ चित्रपटापासून तिला खरी लोकप्रियता मिळाली. चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केलेले आहे. क्रांतीने २९ मार्च २०१७ ला समीर वानखेडे ह्या आयपीएस अधिकाऱ्याशी लग्न केले. तिने लग्नाविषयी खूपच गुप्तता पाळली होती.

तिच्या लग्नात जवळचे काही मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. या बद्दल सांगताना ती म्हणाली कि माझे पती देश सेवेत असल्यामुळे त्यांची ओळख उघड करणे खूपच अवघड आहे आणि त्यामुळेच आम्ही दोघांनी अगदी सध्या पद्धतीने लग्न केले.

Loading...

मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला आवडते. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळायला पाहिजे, असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे. लग्नानंतर ती संसारात रमली. गेल्याच वर्षी तिने जुळ्या मुलींना जन्म दिला.

आजच्या काळात कलाकार मंडळी अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही लक्ष देऊ लागले आहेत. एक चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच क्रांती रेडकरने चित्रपटात दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून सुद्धा काम केले आहे.

म्हणजेच आता अभिनया सोबतच स्वतःचा वेगळा बिझनेसचा हा नवीन ट्रेंड बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच मराठी कलाकारांमध्येसुद्धा पाहायला मिळत आहे. क्रांतीला तिच्या ह्या नवीन बिझनेस साठी आपल्या मराठी गप्पा कडून हार्दिक शुभेच्छा.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

Loading...

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.