श्रीकृष्णाच्या या 3 गोष्टी तुम्हालाही श्रीमंत बनवतील, लवकर जाणून घ्या.

1

कृष्णाची रास-लीला आणि त्यांच्या मधुर बासरीचा आवज कुणाला माहिती नाही. वासुदेव-देवकीचे हे बाळ नंद-यशोदेच्या घरी वाढलं आणि त्याच्या मस्करीने संपूर्ण वृंदावन धुंदाडून काढलं. गुकुळाचा हा लाडका कान्हा कळत न कळत आपल्याला व्यवसायाचे काही ज्ञान देऊन जातो, त्यावर टाकूया एक नजर.

भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातून आपण शिकू शकतो. यातील पहिला मुद्दा आहे –

जन्मगाव: तुमचा जन्म ज्या गावात झाला, तुमचं जन्मगाव लवकरात लवकर सोडलं पाहिजे. तुम्ही जर त्या गावात राहले तर तुम्हाला त्या गावातील लोकं कधीच मोठं समजत नाही आणि त्यांची ती नकारात्मक प्रवृत्ती तुमच्या कामात मानसिक अडचणी आणत राहते. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल, काहीतरी मोठं घडवायचं असेल तर जन्मगाव सोडून दुसऱ्या गावीन जायला पाहिजे आणि तिथे काम सुरु करायला पाहिजे.

जनसंपर्क: दुसरा म्हणजे तुम्ही तुमचा जनसंपर्क वाढता ठेवला पाहिजे. कृष्णाचा मथुरेत जन्म झाला, मग गोकुळात आले, तिथून वृंदावन मग द्वारका. तर म्हणायचं तात्पर्य हेच आहे कि तुम्ही जितका जास्त प्रवास कराल आयुष्यात तितक्या जास्त लोकांशी भेटाल. त्यामुळे तुमचा जनसंपर्क वाढेल. चांगले कामाचे लोकं भेटतील. तुमचं नेटवर्क वाढेल आणि त्यामुळे तुमचं नेट वर्थ वाढेल.

माखनचोर: दही, दुध आणि लोणी यातून कोणती वस्तू महागडी आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही. आणि हेच कारण आहे कि भगवान श्रीकृष्णाने फक्त माखन (लोणी) चोरी करण्याकडे जास्त लक्ष दिलं. त्यांना माहिती होतं कोणती वस्तू मोलाची आहे आणि आपण आपला वेळ कोणत्या कामात घालवला पाहिजे. तसंच तुम्हीही लक्षात घ्या कि कोणत्या कामातून आपल्याला जास्त फायदा होईल आपण तेच काम केलं पाहिजे.

 Credits: https://www.youtube.com/watch?v=eOAmDIaerys

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या परिवारही, दोस्त-मित्रांशी, सहकाऱ्यांशी शेयर करा आणि तुमच्याकडेही अशी माहिती असेल तर आम्हाला पाठवा. आम्ही तुमच्या नावासहित प्रसिद्ध करू. आमचा इमेल – starmarathi1@gmail.com

1 Comment
  1. Avatar
    Abhay says

    Good

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!