प्रयाग राज येथील कुंभ मेळ्यात अंदाजे १० हजार इंजिनीअर्स .. MBA … पदवीधारक बनले नागा साधू

0

आधी तर “इंजिनियरिंग कर, खूप स्कोप आहे…” आणि त्यानंतर “एमबीए कर, खूप स्कोप आहे” असं म्हणून आपल्याला एकपेक्षा एक मोठ्या जाळ्यात ओढणारे ते नातेवाईक आज जरी दिसले तरी आपले रक्त सळसळायला होतंय. इंजिनियरिंग आणि एमबीए करून सगळ्यांचेच वाईट झाले असे नाही (आणि आम्ही सगळ्या उद्योजक आणि नोकरदारांचा आदर करतो, बरं का!) पण ही बातमी वाचून तुम्हाला कळून जाईल कि आपल्या देशात काय चालू आहे.

मित्रांनो कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा उत्सव नुकताच प्रयागराज ह्या शहरात सुरू झाला आहे.. त्या निमित्ताने त्या हे प्रयागराज शहर अगदी गजबजून गेले आहे. वेगवेगळे वेष परिधान केले साधू, साध्वी आणि इतर भाविक ह्या मेळ्यासाठी भारत भारतातून दाखल झालेले आहेत. वेगवेगळ्या आखाड्याच्या साधूंचे शाही स्नान हा खास आकर्षण बिंदू. नागा साधू, किन्नर आखाडा, साध्वी, भाविक, हौशी आणि अगदी परदेशी पर्यटक देखील ह्या कुंभमेळ्यात रमून जातात. पूजा अर्चा, शाही स्नान अशी मेळ्याची रूपरेखा. हजारो वर्षांपासून ही कुंभमे
ळ्याची परंपरा अखंडित चालू आहे.

सध्या कुंभमेळा अंतिम टप्प्यात असून या कुंभमेळ्याच्या या अंतिम टप्प्यात तब्बल 10 हजार जणांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली आहे या दीक्षा घेणारांमध्ये मोठ्या प्रमाणावर इंजिनिअर ते एमबीए पदवीधारकांचा समावेश आहे विशेष म्हणजे नागा साधू बनणे खूप कठीण समजले जाते तरीपण मोठया प्रमाणावर पदवीधरांनी नागा साधू बनण्याची दीक्षा घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागा साधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात. त्यासाठी तब्बल सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. तर नवीन सदस्याला फक्त लंगोटशिवाय कोणतेही वस्त्र परिधान करण्यास मनाई आहे.

नागा साधू फक्त दिवसातून एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांच्या लंगोटचे त्याग करु शकतात.

पण हा कुंभ मेळा नक्की कधी आणि का बरं सुरू झाला ..?

त्याची आख्यायिका अशी की, सत्ययुगात देव आणि दानव ह्यांच्यात अमृत कुंभ प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथनाचा जणू ठराव पास झाला. समुद्रमंथनाच्या वेळी सर्पराज वासुकी ह्याने समुद्र घुसळायला दोरखंड म्हणून मदत देऊ केली. मेरू पर्वताला दोरखंड म्हणून वासुकी ला गुंडाळण्यात आले. आणि सुरू झाले समुद्रमंथन.. जोर लगाके हैशा..!! इकडून देव आणि तिकडून दानव. एकेक पदार्थ मंथनातून बाहेर पडू लागले. विष, कामधेनू गाय, कौस्तुभ मणी, पांढरा घोडा, ऐरावत, पारिजात कल्पवृक्ष, लक्ष्मी देवी, अप्सरा, सुरा म्हणजे मद्य, चंद्र, हरिधनुष्य, धन्वंतरी आणि शेवटी अमृतकुंभ.

आता ज्या अमृतकुंभासाठी दानव आणि देव समुद्रमंथन करत होते ते फक्त दानवांना हवे होते जेणे करून ते सगळीकडे राज्य करू शकले असते. पण त्यांचे हे विचार कळताच इंद्राच्या मुलाने तो कलश पळवला आणि देव दानावांच्यात त्या कलशासाठी १२ सहवास आणि १२ रात्र युद्ध चालले जे माणसांच्या काळानुसार १२ वर्ष चालल्या प्रमाणे होते. त्या युद्धात तो कुंभ १२ ठिकाणी ठेवला गेला आणि तिथे त्यातील काही थेंबही पडले.

चंद्र, सूर्य आणि गुरू ग्रहस्वामींनी त्या अमृत कलशाची आणि पडलेल्या थेंबांची काळजी घेतली. म्हणून त्या १२ स्थलांपैकी प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर ही ४ स्थळे जी पृथ्वीवर आहेत आणि तिथे जेव्हा तो सूर्य, चंद्र आणि गुरू योग्य जुळून येतो तेव्हा तिथे कुंभमेळा आयोजित केला जातो. या ठिकाणी पडलेले अमृताचे थेंब जागृत आहेत असा समज असल्याने तेथील शाहीस्नानास महत्व प्राप्त झालं आहे. ह्या कुंभ मेळ्याच्या अवधीत अमृतकलशास महत्व आहे त्याची आठवण ठेवून तो पुजलाही जातो.

सध्या प्रयागराज हे शहर असेच कुंभमेळ्यासाठी फुललेले दिसते. भारत सरकारतर्फे तिथे अनेक सोयी केलेल्या आहेत. आयुष्यातून एकदातरी ह्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अमृतरुपी शाहीस्नानाचा लाभ घेतला पाहिजे. ह्या अलौकिक उत्सवात न्हाऊन निघाले पाहिजे. तर मंडळी तुम्ही कधी ह्याचा अनुभव घेतला असल्यास आम्हाला जरूर तुमचे अनुभव सांगा..!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!