अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना भैय्यासाहेब कसा घडला ! किरणच्या संघर्षाचा प्रवास !

0

‘बाई वाड्यावर या ‘ हा डायलॉग आजही ऐकला तरी आठवतो तमाम महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खलनायक निळू फुले. मंडळी काही प्रमाणातल्या अभिनेत्यांचे डायलॉग चांगलेच लक्षात राहतात. अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली झी मराठी वरील मालिका ‘लागीर झालं जी ‘ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली ,  ‘लय होतंय हं’ आज्या म्हंटल की शितली आठवते तसेच देअर यु आर म्हंटल की आठवतो भैयासाहेब.

भैयासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या ह्या कलाकाराची भूमिका नकारात्मक जरी असली तरी तमाम महाराष्ट्राच्या मनावर ह्या कलाकाराने नाव कोरलय. भैयासाहेबाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे किरण गायकवाड. रागीट, कारस्थानी ,राजकारणी ,सनकी स्वभावाचा भैयासाहेब साकारण्यासाठी किरणला सुरवातीला खूप मेहनत घ्यावी लागली.

किरणचा स्वभाव भैयासाहेबाच्या स्वभावाच्या विरुद्ध असल्यामुळे किरणला हे पात्र साकारणं चॅलेंजिंग होत ,प्रेमळ साधी राहणीमान हे किरणच्या स्वभावाचे वैशिष्ट्य. किरणची लोकप्रियता पाहता भैयासाहेब साकारण्यात किरण यशस्वी झाला अस वाटत. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ध्येय उराशी बाळगून सतत मेहनत करून किरणने नावलौकिक मिळवले आहे.

सुरवातीला भैयासाहेबाच्या भूमिकेसाठी नाकारही स्वीकारावा लागला होता . किरणने झी मराठीचा सर्वोत्कृष्ट खलनायक ह्या पुरस्कारावर नाव कोरले आहे. मंडळी संघर्ष प्रत्येक माणसाला आपापल्या क्षेत्रात करावाच लागतो मात्र किरणच्या आयुष्यातला संघर्ष प्रेरणादायी आहे. पथनाट्य, नाटक,  एकांकिका, आणि आता मालिका असा किरणच्या संघर्षाचा प्रवास आहे.

कित्येक ओडिशन्स दिल्या पण सुरवातीला संधी मिळवण्यासाठी फार संयम ठेवावा लागला संधी न मिळाल्यास खचून न जाता मेहनत करणं हे यशाचं सूत्र किरणने अंगिकारले .पण आता लागीर झालं जी मालिकेने किरणच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!