लागिर झालं जी २ : सिनेमा की सिरिअल ?
लागीर झालं जी’ ही एक अशी मालिका, जी बंद होवूनही लोकांच्या लक्षात राहिली कारण, त्यामधल्या आज्या, राहुल्या, भैयासाहेब, विक्या ह्यांनी आणि इतर कलाकारांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या मनावर ठसा उमटवला. त्यातल्या प्रत्येक कलाकाराचा एक चाहतावर्ग तयार झाला इतक अप्रतिम काम प्रत्येकाने केले. मात्र, मालिका बंद होवून काही महिने झाले मात्र, हे सगळे कलाकार पुन्हा एकत्र कधी दिसतील? दिसले तर सिनेमात की सिरीयलमध्ये असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले असतील. त्यातल्याच काही प्रश्नाची उत्तर तुम्हाला आज मिळू शकता.
लागीर झालं जी ह्या मालिकेतील कलाकार नितीश चव्हाण, किरण गायकवाड, राहुल मगदम आणि निखील चव्हाण यांनी सोशिअल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आणि मराठी सिनेसृष्टीत चर्चेला उधाण आलं. त्या फोटोने मात्र सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे.
नेमका कोणता फोटो आहे तो ते पाहू. एकाच दिवशी, एकाच वेळी ह्या चार कलाकारांनी लक्ष्यवेधी कॅप्शन टाकत फोटो पोस्ट केला.
फोटोत, श्री गणेशाची प्रतिमा, प्रतिमेला पुष्पहार घातला आहे, प्रतिमेच्या शेजारी क्लॅप बोर्ड आहे. क्लॅप बोर्डवर जे काही लिहिलेले आहे ते मात्र आपल्या मनाची ‘क्वीरिओसिटी’ वाढवणारं आहे. CURIOSITY MEDIA WORKS PVT.LTD अस लिहिलेलं आहे.
अजय भोसले आणि अनुप कारवा ही निर्मात्यांची नाव मात्र पहायला मिळत आहेत. क्लॅप बोर्डसमोर भलीमोठी स्क्रिप्ट ठेवलेली दिसत आहे त्यावर वाहिलेल फुल. टायटल ब्लर केले आहे. दिग्दर्शकाचं नावही ब्लर केले आहे. चर्चेचा मुद्दा हा की, ह्या चार कलाकरांचा सिनेमा येतोय की सिरीयल? असा गोंधळात जरी टाकणारा प्रश्न असला तरी, टाळता न येणारा आहे. ह्या चार कलाकारांनीच हा फोटो पोस्ट केला आहे, ह्यावरून लागीर झालं जी २ येतीये का ? की सिनेमा येतोय?
AD STAR MARATHI