रामायणातील लव-कुश आज दिसतात असे, एका आहे अभिनेता तर दुसरा करतोय हे काम!

मंडळी आपण सर्वजण घरात आहोत या लाॅक डाऊनच्या काळामध्ये आपल्या नागरिकांना नैराश्य येऊ नये म्हणून केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकारची पावले उचलण्यात आली. यामध्ये आपण सर्वांनी मिळून सफाई कर्मचाऱ्यांसाठी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या घरामध्ये राहून टाळ्या देखील वाजवल्या. त्यानंतर आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून देण्यासाठी नऊ मिनिटासाठी दीपप्रज्वलन देखील केले. या प्रयत्नांसोबतच केंद्र सरकारने जनतेला खिळवून ठेवण्यासाठी रामायण आणि महाभारत, शक्तिमान यासारख्या लोकप्रिय सिरीयल डीडी नेशनल वरती परत दाखवायला सुरुवात केली. ज्यांना या आधी रामायण बघायला मिळाले नाही त्यांनीदेखील यावेळी रामायण बघितले आणि एका सर्वेक्षणाच्या अंती अस लक्षात आलं की रामायण जगातील सर्वात जास्त बघितली गेलेली सिरीयल आहे.

रावणवधानंतर देखील उत्तर रामायण या सिरीयलला देखील प्रेक्षकांनीही तेवढाच प्रतिसाद दिला. या उत्तर रामायणामध्ये सीता परित्याग, लवकुश जन्म, अश्वमेघ यज्ञ अशा अनेक सुरस कथांबद्दल आपल्या सर्वांना माहिती मिळालेली आहे. आपण सर्वांनी या सिरीयल ला भरभरून प्रेम देखिल दिलेलं आहे.

या सिरीयल मध्ये लव आणि कुश अशी दोन पात्र दाखवण्यात आलेली आहेत. या दोन पात्रांमध्ये काम केलेले ते कलाकार आज काय करत आहेत याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता नक्कीच असेल. त्यामुळेच आज या लेखाच्या माध्यमातून आपण या दोन कलाकारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

उत्तर रामायणाच्या सुरुवातीला एक टायटल ट्रेक चालू होते, ज्यामध्ये दोन लहान मुलं गीतरामायण सांगत आहेत असं दाखवलेलं आहे. ही दोन लहान मुलं म्हणजे लव आणि कुश यातील लवची भूमिका प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने केलेली आहे. त्याच्या बालपणीचा अभिनय बघून आपल्या सर्वांना तो किती चांगला अभिनेता आहे याची कल्पना नक्कीच आली असेल. तर कुश ची भूमिका मयुरेश क्षेत्रमाडे याने केलेली आहे. स्वप्निल जोशी बद्दल तर आपणा सर्वांना नक्कीच माहिती असेल पण मयुरेश क्षेत्रमाडे काय करतात याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

मयुरेश ने त्याच्या बालपणी लवची भूमिका साकारली हे जरी खरं असलं तरी त्यानंतर मात्र त्याने अभिनय क्षेत्रापासून अंतर राखलं, माहितीच्या आधारे असे सांगण्यात येते की मयुरेश सध्या एका विदेशी कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत आहे.